
भोकर| महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय नामदार प्रा.डॉ. तानाजी सावंत साहेब आरोग्य मंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांनी राज्यातील प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्या बाबत सूचित केल्यानुसार आज दि.९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता ग्रामीण रुग्णालय भोकर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर व भोकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ अनंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण १९ रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये २ महिला (ग्रामीण रुग्णालय भोकर येथील अधिपरीचारीका राजश्री ब्राम्हणे व जिजा भवरे) व १७ पुरुषांनी रक्तदान केले.

डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील रक्तपेढीचे डॉ. अश्विनी देसाई, डॉ संस्कृति कोरडे, बालाप्रसाद भालेराव, संदीप नीलकंठे, अजय राठोड, श्रीमती उमा गरड, प्रज्ञा भवरे, विशाखा भवरे, रामराव जोंधळे व राजू औराळे हे हजर होते. भोकर तालुकाध्यक्ष अमोल पवार, शहर प्रमुख अजय टाक, चैतन बारडकर, अनिल जाधव व पदाधिकारी उपस्थित होते.

ग्रामीण रुग्णालय भोकर येथील डॉ नितीन कळसकर, डॉ सागर रेड्डी, डॉ राजाराम कोळेकर, डॉ आशिया शेख, डॉ विजया किनिकर, रक्तपेढी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मनोज पांचाळ, बालाजी चांडोलकर, अत्रिनंदन पांचाल, जाहेद अलि बतलवाड, आरोग्य सहायक सत्यजीत टिप्रेसवार, क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी रोहिणी भटकर , साबेर पाशा, औषध निर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे, मल्हार मोरे,आरोग्य कर्मचारी पांडुरंग तम्मलवाड,नामदेव कंधारे, बबलू चरण, आरके एसके समुपदेशक सुरेश डुमलवाड, आरोग्य मित्र सुधाकर गंगातिरे, बाबुमिया व सेवक आदी उपस्थित होते.

