हिमायतनगर| हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय रक्तदान शिबीर घेण्यात आले. राजा भगीरथ विद्यालय हिमायतनगर येथून जागरूक पालक सुदृढ बालक या अभियानाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर डी डी गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदेश पोहरे, शाळेचे मुख्याध्यापक सर, दिकतवार सर, व सर्व रुग्णालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अभियानात 0 ते 18 वर्षापर्यंतच्या बालकाची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि. 09.02.2023 रोजी ग्रामीण रुग्णालय माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसीकर, डॉक्टर डी डी गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली आधार ब्लड बँक नांदेड अंतर्गत महा रक्तदान शिबिर घेण्यात आले.
त्यावेळी, भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी व डॉ गणेश कदम यांच्या हस्ते रक्तदान शिबीर चे उदघाटन करण्यात आले उपस्थित डॉक्टर संदेश पोहोरे, डॉक्टर माधव भुरके, डॉक्टर वैभव नकाते, डॉक्टर गणेश कदम, डॉक्टर रावते, डॉक्टर शेवाळकर, डॉक्टर मुक्कावार, डॉक्टर प्रताप परभनकर, डॉक्टर अंकुश सदावर्ते, सतीश भरांडे, श्री दराडे, दीपक इंगोले, रमेश धांडे, पंडित साबळे, महेश साळुंखे, सय्यद सादिक, शे फारुख,पोषटी जाधव, लखन, नागेश आदींनी रक्तदान केले. या शिबिरामध्ये 18 जणांनी रक्तदान केले.