
हिमायतनगर। मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था संचलित, हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर व करिअर कट्टा स्पर्धा परीक्षा व रोजगार मार्गदर्शन विभाग, आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व पारितोषिक वितरण समारंभात, पंचायत समिती हिमायतनगरचे गट विकास अधिकारी मयूरकुमार अंदेलवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा माणसाला नवी दिशा व जीवन जगण्याचे बळ देत असतात असे स्पष्ट केले.

त्यांनी विविध स्पर्धा परीक्षेची माहिती आणि अभ्यास कसा करावा याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच या कार्यक्रमाचे मार्गदर्शक पंचायत समिती हिमायतनगरचे कनिष्ठ लेखा अधिकारी, राम कवडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना वेळेचे महत्व आणि उपयोग कसा करावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले व स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी नियोजन याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते यांनी माहिती तंत्रज्ञान याचा उपयोग करून जीवनात यश प्राप्त करता येते असे सांगितले.

तसेच महाविद्यालयातर्फे करियर कट्टा अंतर्गत चालणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती सांगितली तसेच शैक्षणिक वर्ष 2022- 23 या वर्षांमध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक या कंपनीमार्फत घेतलेल्या कॅम्पस मुलाखतीमध्ये महाविद्यालयातील 25 विद्यार्थिनीची टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये मध्ये निवड झालेली आहे. आणि त्या तामिळनाडू येथील हौसूर येथे ट्रेनिं म्हणून सध्या कार्यरत आहे असे सांगितले.

या कार्यक्रमाचे आयोजक करिअर कट्टा समन्वय, डॉ. दत्ता मगर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन डॉ. संघपाल इंगळे यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सय्यद जलील यांनी केले व्यासपीठावर स्टाफ सेक्रेटरी डॉ. डी. के. कदम व न्याक समन्वयक .डॉ. जी.पी दगडे हे उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

