हदगाव/तामसा, गजानन जिदेवार। उपजिल्हा रुग्णालय हदगाव तालुका अंतर्गत जागरूक पालक सदृढ बालक अभियास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांडा हदगाव येथे दिनांक ९ रोजी सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी उपस्थित नगरअध्यक्षा ज्योतीताई राठोड व नगरसेवक अमित अडसुळ, विनोद राठोड तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्हीं जी ढगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुरमुरे सर्व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकारी व महिला वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील सर्व बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर व्ही जी ढगे यांनी दिली आहे याचबरोबर आर बी एस के अंतर्गत विविध रोगांवर झालेल्या शस्त्रक्रिया विषयी माहिती ही यावेळी देण्यात आली आहे यामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत अंतर्गत २००८ पासून कार्यरत कार्यक्रमांमध्ये आजपर्यंत एकूण १०६ हृदय शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत यामध्ये ० ते ६ मधील २३ मुलांचा समावेश आहे. २०० पेक्षा जास्त इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
२०१३ पासून कुपोषण मुक्त मध्ये ही राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे महत्त्वाची भूमिका बजावली असून कर्णबधिर मुलांची शस्त्रक्रिया या १० ते १२ लाख खर्च येणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा अंतर्गत दोन मुलांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली व तसेच दृष्टीदोष व कर्णदोषांच्या एकूण ७५० मुलांना या कार्यक्रमांतर्गत लाभ देण्यात आला व एकूण ५०० दृष्टीदोष असणाऱ्या मुलांना मोफत चष्मे देण्यात आले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य आरोग्य अभियान या अभियानांतर्गत हदगाव तालुक्यात सर्वच ठिकाणी शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांना आरोग्य तपासणी करणे शासनाने नेमून दिलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत पतंग पथकांमार्फत तालुक्यातील सर्व अंगणवाडी व तसेच प्राथमिक शाळा येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कर्मचारी व अधिकारी तत्पर सेवा देत असतात यामुळे शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील बालकांना आरोग्य विषयक समस्या असल्यास त्या समस्या पूर्ण करण्यासाठी पथक नेहमीच आपली सेवा बजावत असतात यामुळे ०-१८ वर्षे वयोगटातील मुलांना राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम हा संजीवनी देणारा ठरतो आहे.
यावेळी डॉ. बी एन पोटे, डॉ. गंगासागर आर. जी डॉ.निमडगे डी.डी डॉ. कनवाले डॉ. भद्रे डॉ.तावरे औषध निर्माण अधिकारी दिपाली दुधारे, वैभव कोल्हे, प्रियंका कदम,व तसेच वर्षा जाधव, रूपाली सातव ,आणि शुभांगी घाटे, ANM इत्यादीची उपस्थिती होती.