नवीन नांदेड। यशस्वी जीवन होण्यासाठी परिश्रमा बरोबरच योग्य नियोजन असने गरजेचे असते . प्रशासकिय सेवा असो वा अन्य कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थांनी विद्यार्थीदशेतच आपले ध्येय निश्चित करुन त्याचे नियोजन करुन त्या नियोजनाची अमलबजावणी केल्यास हमखास यश मिळते त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी विद्यार्थींनी अंगिकारावी असे मत नांदेड वाघाळा महानगर पालिकेचे आयुक्त डाँ. सुनिल लहाणे यांनी नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाच्या प्रभातफेरी बक्षिस वितरण सोहळ्यात व्यक्त केले .
नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाच्यावतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने सिडको – हडको परिसरातील शाळेतील विद्यार्थांसाठी प्रभातफेरी स्पर्धेचे आयोजन प्राथमिक व माध्यमिक गटासाठी करण्यात आले होते . या प्रभातफेरी स्पर्धेचे बक्षिस वितरण दि ९ रोजी हडको येथील गुरुकृपा मंगल कार्यालयात आयोजन केले होते. पारितोषिक वितरण सोहळ्याचे उदघाटक म्हणुन नांदेड वाघाळा शहर महापालिकेचे आयुक्त डॉ .सुनिल लहाणे हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी हे होते.
तहसिलदार किरण अंबेकर , पत्रकार संघाचे महानगरध्यक्ष शिवराज बिच्चेवार , मनपाचे सहाय्यक आयुक्त, डाॅ. रयसोद्दीन शेख ,वृक्षमित्र मोहन घोगरे पाटील , वाजेगाव जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे , बळीरामपुर जिल्हा परिषद सदस्य सदस्य गंगाप्रसाद काकडे ,सहायक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात ,भाजपा युवामोर्चाचे महानगध्यक्ष संजय पाटील घोगरे , संतोष मोरे मनपाचे माजी विरोधी पक्षनेते ,जिवन पाटील घोगरे , राज्य पुरस्कार प्राप्त खंडेराव बकाल पोलिस पाटील , डॉ.नरेश रायेवार,भिमराव जमदाडे,जेषठ नागरिक शंकरराव धिरडीकर ,सेवानिवृत मुखयाधापक शेख, पुरस्कार प्राप्त जयवत काळे, शिवसेनेच्या निकिता शहापुरवाड, डॉ.भिसे,लक्षमण रेवणवार,व परिसरातील प्राथामिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , विधार्थी व विधार्थीनी यांची उपस्थिती मोठ्या संख्येने उपस्थिती होती .
प्रारंभी वृक्षमित्र मोहन पाटील घोगरे यांच्या संकल्पनेतुन वृक्षारोपन करुन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली , तर स्वागत गित स्वरछंद प्रतिष्ठानचे बंडा रवंदे व संचाने केले,यावेळी प्रभातफेरी स्पर्धेत पारितोषिक मिळवलल्या शाळाना मान्यवराच्या हस्ते सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र ,शाल श्रीफळ देऊन उपस्थित मान्यवराच्या हस्ते गौरव करण्यात आला, या स्पर्धेत माध्यमिक गटातुन प्रथम इदिंरा गांधी हायस्कुल हडको , द्वितीय कुसुमताई विद्यालय सिडको , तिसरा राष्ट्रमाता कस्तुबा गांधी हायस्कुल तर उत्तेजनार्ध विद्यानिकेतन हायस्कुल हडको यांना तर प्राथमिक गटातुन प्रथम नरसिंह विद्यामंदिर सिडको , द्वितीय प्रियदर्शनी इंदिरा गांधी शाळा हडको , तिसरा कुसुमताई प्राथमिक शाळा सिडको ,उत्तेजनार्थ छत्रपती शिवाजी विद्यालय प्राथमिक शाळा हडको , संतोष कन्या प्राथमिक शाळा हडको , महात्मा गांधी प्राथमिक शाळा सिडको यांना सन्मानचिन्ह, शाल व घड्याळ देवुन सन्मानित करण्यात आले , तर स्पर्धा परिक्षक शेख मोईन लाठकर यांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाच्या वतीने नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गोवर्धन बियाणी व नांदेड महानगर अध्यक्षपदी शिवराज बिचेवार यांच्यी निवडीबद्दल नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाच्या वतीने उपस्थित मान्यवराचा हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण देशमुख यांनी केले. तर सुत्रसंचलन विद्यादान कोचिंग क्लासचे संचालक प्रा.मधुकर गायकवाड यांनी केले, तर आभार निळकंठ वरळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीते साठी उपाध्यक्ष श्याम जाधव ,सचिव रमेश ठाकुर ,सल्लागार तुकाराम सावंत , अनिल धमने , कार्याध्यक्ष तिरुपती पाटील घोगरे यांनी परिश्रम घेतले .
विद्यार्थाच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी अशा स्पर्धा व्हाव्यात — गोवर्धन बियाणी, शालेय स्तरावर विविध स्पर्धातुन विद्यार्थाच्या कलागुणांना वाव मिळत असतो. राष्ट्रीय सणाचे औचित्य साधुन अशा स्पर्धा झाल्या तर अनेक विद्यार्थाच्या अंगिअसलेल्या कलागुणांना वाव मिळेल व ती कला तो आयुष्यभर जोपासेल ,प्रत्येकांच्या अंगी एक कला असते. पण ति कला विकसीत करण्यासाठी अशा स्पर्धा शालेयस्तरावर व सामाजिक कार्यकत्यानी त्या स्पर्धा आयोजित केल्या तर विद्यार्थांना व्यासपिठ मिळेल . हा उपक्रम स्तुत्य आहेच याबरोबर निबंध , वकृत्व स्पर्धा , सह लेखन वाचन हे विद्यार्थात रुचवल्यास विद्यार्थाचा व्यक्तीमहत्व विकास सुधारेल असे मत नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले .