
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। शरदचंद्र महाविद्यालय नायगाव ( बा .) येथे ग्रंथालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विविध उपक्रमाचा एक भाग म्हणून ग्रंथालय विभागाच्या वतीने मराठी साहित्याचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले होते .

या एक दिवसीय ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध कवी व चित्रकार श्री .बालाजी पेटेकर यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य , के . हरिबाबू हे होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ . बी .आर . लोकल वार यांनी केले तर उद्घाटनास उत्तर देताना श्री . बालाजी पेटेकर म्हणाले आज मराठी भाषेचा गौरव करण्याबरोबरच अशा ग्रंथ प्रदर्शनातून मराठी भाषेचे चिंतन करण्याची वेळ आली आहे .

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ग्रंथालयाने विविध प्रकारचे वाचन साहित्य वाचकांना उपलब्ध करून द्यावे व मराठी भाषेला वैभव प्राप्त करून द्यावे . याचबरोबर महाविद्यालयातील ज्येष्ठ प्रा . डॉ .शंकर गड्डमवार प्रो डॉ . बलभीम वाघमारे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले मनोगतात मातृभाषेचा सन्मान व संवर्धन करणे प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीचे कर्तव्य आहे . मराठी भाषा ही आपुलकी निर्माण करणारी आहे .तर इंग्रजी भाषा ही जागतिक ज्ञान देणारी भाषा आहे . अशा सर्व प्रकारचे ग्रंथ ग्रंथालयात वाचकांसाठी उपलब्ध आहेत .

यासाठी अशा ग्रंथ प्रदर्शनातून आपल्याला न संपणारे असे मौल्यवान धन असून ग्रंथ सामान्यातील सामान्य माणसाला घडवत असते . असे मनोगतात डॉ . बलभीम वाघमारे यांनी व्यक्त केले . तत्पूर्वी प्रमुख पाहुण्यांचे ग्रंथालयाच्या वतीने शाल व ग्रंथ देऊन ग्रंथपाल डॉ . बी आर . लोकलवार व प्राचार्य के . हरिबाबु यांनी त्यांचा सत्कार केला . या भव्य ग्रंथ प्रदर्शनास महाविद्यालयातील विद्यार्थी व सर्व प्राध्यापकांनी उपस्थित राहून मराठी ग्रंथ साहित्याचा मनमुराद आस्वाद घेतला .

