
नांदेड| नांदेड येथील गोवर्धन घाट वजीराबाद नांदेडचे जागृत देवस्थान श्री खेड तपस्वी विठ्ठल महाराज मठ येथे श्री शिव महापुराण कथा आयोजन केले आहे या शिवमहापुराण कथेचा लाभ शिवभक्तानी घ्यावे आसे अव्हान संयोजक सुरेश लोट यानी केले आहे.

श्री सद्गुरू चंद्रशेखर महाराज देगलुरकर यांचे कृपापात्र शिष्य ह.भ.प.ऍड श्री.नारायण महाराज सोनखेडकर हे शिवमहापुराण कथा सागणार आहेत.या शिवमहापुराण कथेच्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर.भाजपा महानगरध्यक्ष प्रविणभाऊ साले.धर्मभुषण दिलीप ठाकुर व भाजपाचे शहरातील पदधिकारी उपस्थित राहाणार आहेत.

नांदेड येथील गोवर्धन घाट वजीराबाद श्री खेड तपस्वी विठ्ठल महाराज मठ येथे महाशिवरात्री निमित्ताने दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन केले जाते तर या वर्षी पहिल्यांदा शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक : 12 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2023 वेळ रोज सकाळी 11.00 ते 1.00 वाजेपर्यंत हि कथा सांगितले जाणार आहे व आरती व प्रसाद भक्ताना या ठिकाणी मिळणार आहे तर समाप्ती व महाप्रसाद 19 फेब्रुवारी 2023 सकाळी 11 वाजता आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक भाजपा कामगार आघाडीचे सुरेश लोट.शिवा लोट.पत्रकार सुनिल रामदासी. नरेश लोट.शिवचरण लोट.अँड.सतिश पुंड.गोविंदराव जाधव.प्रिंस रामगडीया.प्रदिप दगडु जाधव.संदिप छप्परवाल.अशोक भोरगे.दिलीप घेनेकर.बंजरग टोकलवाड.सौ.संध्या छप्परवाल.सौ.सुनिताताई चव्हाण.सौ.रोहिणी कारले.सौ.चंदाताई जाजू.सौ.मंजूळा टोकलवाड.सौ.शितलताई सुरेश लोट.सौ.राधा चौधरी.अदि परिश्रम करत आहेत.

