
उस्माननगर। दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री.सिध्देश्वर शिवमंदिरात ५४ वा अखंड शिवनाम सप्ताहास श्री.संत शिरोमणी शिवयोगी मन्मथस्वामी यांच्या कृपेने ,व श्री. गुरुवर्य १०८ ष. ब्र. शिवाचार्यरत्न सांबशिवाचार्य महाराज ,व श्री. गुरुवर्य १०८ वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर यांच्या प्रेरणेने तथा श्री. वैजनाथ स्वामी व शिवहार स्वामी यांच्या हस्ते दिनांक १० फेब्रुवारी २०२३ रोजी शिवभक्तीमय वातावरणात अत्यंत उत्साहात प्रारंभ होत असून याच दिवशी (१०/२/२०२३) रोजी श्री. १०८ ष.ब्र. शिवाचार्यरत्न सांबशिवाचार्य महाराज यांचा ८९ व्या वाढदिवसाच्या मंगलमय वातावरणात शिष्यवृंदाकडून चरणस्पर्श अभिष्ठचिंतन सोहळ्याचे आयोजन केले आहे. १७ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाने सांगता होणार आहे.या कार्यक्रमासाठी गुरुवर्यांची उपस्थिती आणि अमृतोपदेश देणार आहेत.

यावेळी श्री. गुरु १०८ ष.ब्र. शिवाचार्य रत्न सांबशिवाचार्य महाराज ,थोरलामठ वसमत , श्री. गुरु १०८ ष.ब्र. डॉ. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज ,लासिनामठ पुर्णा ,श्री. गुरु १०८ ष.ब्र. रूद्रमुनी शिवाचार्य महाराज , मुदखेड ,श्री. गुरु १०८ ष.ब्र. वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज थोरलामठ वसमत ,श्री.गुरु १०८ ष.ब्र. चंद्रशेखर शिवाचार्य महाराज ,माजलगावकर यांची उपस्थिती लाभणार आहे.

अखंड शिवनाम सप्ताहातील दैनिक कार्यक्रम पहाटे ५ ते ६ शिवपाठ ,६ ते ७ श्री सिध्देश्वरास अन्नदात्याकडून रूद्राभिषेक ,९ ते ११ ग्रंथराज परमरहस्य पारायण ,११ ते १ प्रवचन ,१२ ते ३ सकाळचा प्रसाद ,साय.४ ते ५ गाथा भजन ,५ ते ६ शिवपाठ , रात्री ९ ते ११ शिवकीर्तन ,११ ते १२ गुरूवर्याचे प्रवचन ,१२ ते १ शिवजागर होईल.तर अखंड शिवनाम सप्ताहातील किर्तनकार दि. १० फेब्रुवारी रोजी किर्तनकार शि.भ.प. तानाजी पाटील थोटवाडीकर तर प्रवचनकार शि.भ.प. सिध्देश्वर स्वामी , नांदेड ,दि.११ रोजी कीर्तनकार शि.भ.प. मोहन कावडे महाराज हसनाळीकर तर प्रवचनकार शि.भ.प. श्री. देवजी नरवाडे ,गुंज ,दि.१२ रोजी कीर्तनकार शि.भ.प. सौ. शिवकांता पळसकर ,लोहा तर प्रवचनकार शि.भ.प. सौ.सत्यभामा येजगे नांदेड

दि.१३ रोजी कीर्तनकार शि.भ.प. लक्ष्मण विभूते गुरू लातूर ,तर प्रवचनकार शि.भ.प. सौ. संगिता कार्लेकर सिडको ,दि.१४ फेब्रुवारी रोजी कीर्तनकार शि.भ.प. सौ. कावेरी किशनराव मुतखेडे ,तर प्रवचनकार शि.भ.प. शिवराज गोदरे स्वामी बारसगाव , दि.१५ रोजी कीर्तनकार शि.भ.प. शि.बा. मानखेडकर गुरुजी उदगीर ,तर प्रवचनकार शि.भ.प.सौ.संगिता कहाळेकर ,शि.भ.प.श्री. हानमंतराव बामणीकर ,दि.१६ रोजी कीर्तनकार शि.भ.प. शिवशरण गुरुजी रटकलकर , हिंगोली ,तर टाळ आरती कीर्तन शि.भ.प. बालाजी पोटजळे काकांडी यांचे होईल . त्यानंतर दुपारी गावातील प्रमुख रस्त्याने श्री संत शिरोमणी शिवयोगी मन्मथस्वामी यांच्या प्रतिमेचे व ग्रंथराज परमरहस्य पारायण गाथाची मिरवणूक काढण्यात येणार आहे.दि.१७ फेब्रुवारी रोजी प्रसादावरील शिवकीर्तन श्री. सद्गुरू युवासंत वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज थोरलामठ वसमत यांचें होणार आहे. त्यानंतर सार्वजनिक महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे वीरेश्वर लिंगायत समाज उस्माननगर (मोठी लाठ )यांनी केले आहे.

