
नांदेड। हिमायतनगर तालुक्याचे भूमिपुत्र डॉ निलेश बास्टेवाड, एमडी मेडिसिन हे रेणुकाई क्रिटिकल केअर सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड येथे कार्यरत असुन त्यांच्या नेतृत्वाखाली रेणुकाई हॉस्पिटल्स् – अनेक रुग्णांसाठी संजीवनी ठरत असून रेणुकाई हॉस्पिटल्स् च्या माध्यमातून मागील ६ वर्षात १०००० पेक्षा जास्त गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया तसेच १००० पेक्षा जास्त रुग्णांवर अँजिओप्लास्टी ,लाखो रुग्णांना डायलिसिस सुविधा तसेच हजारो विषबाधा, सर्पदंश (सर्पदंश) , अपघात, मुतखडयाचा आजार याशिवाय डेंगू,मलेरीया,ताप,पक्षाघात अशा अनेक रुग्णांवर रेणुकाई मल्टिस्पेशालिटीने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत यशस्वी उपचार केले आहेत ..

त्यांच्या या कामगिरीबद्दल रेणुकाई हॉस्पिटल्स् चा महाराष्ट्र शासनाच्या वतीने २०२२ साली टॉप परफॉर्मिंग हॉस्पिटल म्हणून प्रजासत्ताक दिना दिवशी पालकमंत्री अशोकराव चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला होता ..

डॉ.निलेश बास्टेवाड हे रुग्णांना आपले वाटणारे डॉक्टर असल्यामुळे हिमायतनगर परिसरातील हिमायतनगर,सरसम,सिरंजनी, इस्लापूर, किनवट, तामसा,हदगाव तालुक्यातील अनेक गाव-खेड्यातील रुग्णांबरोबरच, नांदेड शहरातील लाखो रुग्णांनी उपलब्ध सेवांचा लाभ घेतला आहे अशी माहीती डॉ.बास्टेवाड यांनी दिली तसेच पुढे ते म्हणाले की, आपल्या जन्मभूमीच्या सेवेच्या ऋुणत्वातील सेवेच्या भावनेने मागील २०१८ सालापासून आपली जन्मभूमी असलेल्या हिमायतनगर येथे आरोग्य शिबीर घेतात यात हॉस्पिटल्स् ची टिम प्रत्येक महीन्याच्या पहिल्या बुधवारी हिमायतनगरात स्वखर्चाने जाऊन तेथे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करते या शिबीरात सर्वच प्रकारच्या आजारांचे रोगनिदान व प्रथोमोपचार करण्यात येतात अशी माहीती रेणुकाई हॉस्पिटल्स् चे संचालक डॉ.निलेश बास्टेवाड यांनी दिली..

ह्दयविकार , एक्सीडेंट, मुतखडा उपचार व शस्त्रक्रिया, किडनी, मूत्रपिंड कॅन्सर, मूत्र नलिकेमध्ये बाधा असण,•किडनीवर सूज येणे म्हणजेच प्रोस्टेट, पुरुष ग्रंथी आजार, जनरल सर्जरी, रक्तदाब व रक्ताच्या सर्व प्रकारचे आजाराचे निदान व उपचार, दमा,मेंदूज्वर, थायरॉईड, मधुमेह, विषबाधा व सर्पदंश रुग्णांचे निदान व उपचार, अस्थीरोग निदान व उपचार, गुडघ्याचे आजार व मणक्याचे आजार, मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार, कॅन्सर अशा विविध व्याधी व आजार यावर रेणुकाई हॉस्पिटल्स् येथे उपलब्ध उपचार सुविंधाचा लाभ घ्यावा असे आवाहन रेणुकाई हॉस्पिटल्स् चे संचालक डॉ.निलेश बास्टेवाड यांनी केले आहे..

लवकरच नांदेडातील पहीले CTVS ऑपरेशन थिएटर रेणुकाईत

डॉ. निलेश बास्टेवाड म्हणाले की आजच्या घडीला वैदयकीय क्षेत्रात अमूलाग्र बदल होतांना दिसून येत असतात त्याला अनुसरत आपल्या नांदेडात आम्ही आमच्या रेणुकाई हॉस्पिटल्स् येथे शासनाच्या वतीने रुग्णांसाठी राबविण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले, प्रधानमंत्री आरोग्य योजना , कर्मचारी राज्य बीमा निगम या योजने अंतर्गत उपचार सेवा उपलब्ध केल्या आहेत तसेच यापुढेही उत्तम रुग्णसेवेसाठी रेणुकाई हॉस्पिटल्स् हे कायम कटीबद्ध असेल तसेच सर्व अद्ययावत यंत्र व सुविधांनी सुसज्ज असे CTVS असे संपूर्ण वेगळे असे ऑपरेशन थिएटर जे की अंत्यत जटील शस्त्रक्रियेच्या दृष्टीने पूर्णत: निर्जंतुक केलेलं असेल जिथे बायपास, वॉल सर्जरी अशा ह्दयासंदर्भातील शस्त्रक्रिया आपल्या नांदेडातच केल्या जातील .. रेणुकाई हॉस्पिटल्स् हे दर्जेदार आणि उच्चतम वैद्यकीय सेवांसाठी नेहमीच कटीबद्ध असेल…

….डॉ. निलेश बास्टेवाड , संचालक , रेणुकाई मल्टी्स्पेशालिटी हॉस्पिटल्स् , हिंगोली नाका , नांदेड . बाफना रोड,एलआयसी ऑफीसच्या मागे, महाराणा प्रताप चौकाजवळ, हिंगोली नाका , नांदेड, संपर्क- फोन – ०२४६२- २२१६६६ व २२२६६६ .. 9730712666, 9767284883 संपर्क साधवा
