
लोहा| लोहा तालुक्यातील गोदा नदी काठच्या गावात अवैध वाळू उपसावर उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलिक तहसीलदार व्यकटेश मुंडे यांच्या टीमने कार्यवाहीचे अस्त्र उगारले आहे थंडी – रात्रीचा किर्रर्रर्र अंधार कट्ट्या कुपाट्या यातून मार्ग काढत या अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कार्यवाही केली जात आहे सुट्टीचा दिवस असतानाही बुधवारी टीम मुंडे यांच्या पथकाने पेनूर-बेटसांगवी भागातील गोदावरीच्या पात्रातून वाळू उपसा करणारे १४ तराफे नष्ट करण्यात आले.

गोदा काठच्या पेनूर, भरसावडा, अंतेश्वर, बेट सांगवी , शेवडी, यासह येळी, कामळज, उमरा सर्कल भागातील नदी काठच्य गावात वाळू उपसा अवैधरित्या केला जातो.पण उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलिक तहसीलदार मुंडे यांच्या टीमने सातत्याने करीत असलेल्या कार्यवाहीमुळे अवैध वाळू काढणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

बुधवारी (८ फेब्रुवारी) तहसीलदार व्यंकटेश ब मुंडे,नायब तहसीलदार राम बोरगावकर यांच्या पथकाने ज्यात मंडळ अधिकारी काठारे, ,मंडळ अधिकारी मक्तेदार, तलाठी मारोती कदम, विद्यासागर पाईकराव, संतोष असकूलकर, राजु इंगळे, संदीप फड, गौरजी कासेवाड, नीळकंठ पांडागळे, परशुराम जाधव,मोतीराम पवार, कपाटे,: डी जी शिंदे यांनी दिवसभर पेनूर-बेट सांगवी या भागात झाड झुडपे , कट्ट्या कुपाट्या तुडवीत १४तराफे नष्ट करण्यात आले त्यामुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत

