हिमायतनगर| हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु. येथील एक युवा शेतकऱ्याने कर्ज बाजारी व नापिकीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना शुक्रवार दि.१० रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली असून, बबन केशवराव माने वय ३५ वर्ष असे मयत शेतकऱ्याचा नाव आहे.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा बु. येथील अल्पभूधारक युवा शेतकरी बबन केशवराव माने वय ३५ हा गेल्या काही दिवसांपासून नापीकी व कर्जबाजारी पणामुळे चिंताग्रस्त होता. गेल्या दोन वर्षांपासून शेतात उत्पन्न मिळत नाही, आता मुला बाळाला काय खाऊ घालावे. संसाराचा गाडा कसा चालवावा म्हणून तो नेहमी बोलत होता.
याच चिंतेत शुक्रवारी त्यांनी आपल्याच शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जिवन यात्रा संपवली. मयत शेतकरी बबन माने यांच्या मृत्यू पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, असा परिवार आहे. या babat नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलीस डायरीत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार श्री कदम हे करीत आहेत.