
हिमायतनगर, अनिल मादसवार। शहरातील प्रसिध्द व्यापारी भास्कर चिंतावार यांच्या परसबागेत असलेल्या एका गुलाबाच्या झाडाला लागलेल्या कळ्या उमललेल्या असून, त्यापैकी एका गुलाबाच्या फुलात अनेक गुलाबकळ्या निघाल्या आहेत. हा प्रकार गणेश चतुर्थी दिनी दिसून आला असून, त्या गुलाब फुलाचे छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही निसर्गाची किमया की चमत्कार..? असा प्रश्न शहरात चर्चिल्या जाते आहे.

सध्या गुलाबाच्या झाडाला लगडलेल फुल न तोडता झाडालाच असून, फुलांमध्ये निघालेल्या विविध काळ्यातून गुलाब पुष्प उमलेल काय..? याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे.

