हदगाव, शे चादपाशा| हदगाव तालुक्यात मोठा उद्योग नाही तसेच शेतीशिवाय पर्याय नसल्याने शेतमजुरी करण्याशिवाय रोजगाराचे दुसरे साधन नाही. त्यामुळे मजुरांना पोटाची खळगी भरण्यासाठी राज्या बाहेर मुबई हैद्राबाद व ई राज्याच्या ‘मेट्रो ‘शहरा शिवाय कामासाठी भटकंती केल्याशिवाय पर्याय नाही.
नादेड जिल्ह्यातील अतिमागास हदगाव अतिदुर्गम तालुक्याची ओळख आहे. तालुक्यात रोजगाराची खूप मोठी समस्या आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे खरीप आणि रब्बी हंगामातील कामेही लवकरच आटोपली असल्याने शेतमजुरांच्या हाताला कामे नाहीत. काम नसल्याने तालुक्यातील मजुरांची रोजगाराच्या शोधात भटकंती सुरू आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये गावपातळीवर रोजगारहमीची कामे सुरू झाली की नाही. या बाबतीत प्रशासनाकडू माहीती मिळत नाही. निसर्गाच्या लहरी व अवकृपेने शेतकऱ्यांप्रमाणेच मजुरांवरही आस्मानी संकट ओढवले आहे. खरीप हंगाम संपला की तालुक्यातील मजूरांना रोजगाराचा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. तालुक्यात रोजगार उपलब्ध नसल्याने पोटाची खळगी भरण्याकरिता लहान मुलाबाळासह मजुरांना मुंबई, पुणे सारख्या शहरात तसेच अन्य जिल्ह्यात तालुक्याच्या ग्रामीण भागात जावे लागते.
त्या ठिकाणी कापूस वेचणे मिरची उस तोडणे, पडेल ते कामे गवंडी काम करणे तसेच मिळेल त्या कामासाठी भटकंती करावी लागते. सध्या तालुक्यातील गावेच्या गावे ओस पडत आहेत. त्यामुळे शेकडो मजुरांना गावातल्या गावात काम मिळेल. यातून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक बळ मिळेल. मात्र, पंचायत समितीच्यावतीने माञ साफ याकडे दुर्लक्ष करण्यात येते. तहसील कार्यालय पंचायत समितीने दखल घेऊन प्रत्येक गावात रोजगार हमीची कामे सुरू करून तालुक्यातील मजुरांची भटकंती थांबवावी. अशी मजूर वर्गाची मागणी आहे. पण लक्ष देतो कोण..? असा संतप्त सवाल ग्रामीण भागातील शेतमजुर यांनी केला आहे.
या बाबतीत शासनाच्या विविध योजना शासनाद्वरे तालुक्यातील कोणत्या गावात राबविण्यात आल्या. किती कामे सुरु आहेत यासंबंधी माहीती घेतली असता तहसिल कार्यालय व पचायत समिती कार्यालय हदगावकडे विचारणा केली असता नेहमी प्रमाणे माहीती उपलब्ध नसल्याचे सागण्यात आले.