
उस्माननगर, माणिक भिसे| निवासी अंध विद्यालय धनेगाव नांदेड येथे नुकतेच अंध विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लब नंदीग्राम नांदेड व नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिरास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अभिजीत राऊत ( जिल्हाधिकारी नांदेड ) सौ.वर्षा ठाकूर ( जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ) जिल्हा समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार ,सौ.हेमा राचमाले ( अमेरिका समाजसेविका ) प्रा.वाय.बी.गायकवाड ( माजी प्राचार्य ) शाळेचे सचिव श्री. नागनाथ कदम ,दीपक कदम ,सौ.पाटीलबाई , यांची उपस्थिती होती.सदरील शिबिराचे उद्घघाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .त्यानंतर उपस्थित पाहूण्याचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.अंध विद्यार्थ्यांनी सुदर असे स्वागत गीत गाऊन प्रमुख पाहुण्याचे स्वागत केले.

अंध विद्यालय आणि प्रशिक्षण केंद्र धनेगाव येथे अंध विद्यार्थ्यांच्या आरोग्याची व डोळ्यांची तपासणी करण्यात आली.रोटरी क्लब नंदीग्राम नांदेड आयोजित वल्लभ युथ ऑर्गनायझेन , डायनॅमिक वुमेन्स ग्रुप प्रायोजित अंध विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट पांढरी काठी वाटप करण्यात आली.या कार्यक्रमास समाज कल्याण विभाग अधिकारी गोडगोडवार , डॉ. रामचंद्र हेंडगे डॉ.शुभांगी पतंगे ,( एन.ए.बी.नांदेड ) अध्यक्ष डॉ. पुष्पा गायकवाड ( अध्यक्षा रोटरी क्लब नंदीग्राम नांदेड) ,रेखा गरूडकर ( सचिव रोटरी क्लब नंदीग्राम ) डॉ . सुचिता भुरे , सुनंदा देवणे , ज्योती पत्रे रोटेरियन्स ,प्रा. शीतल गायकवाड ,सौ.शारदा गायकवाड ,प्रा. अथिया काद्री यांची उपस्थिती होती.

यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून मार्गदर्शन केले.व अंध विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट पांढरी काठी व चष्मे दिलें. या.कार्यक्रमात अशोक शहा ,उमा देसाई यांनी सहकार्य केले.याप्रसंगी हेमा राचमाले यांना रोटरी एक्सलेन्स अवाॅर्ड ने गौरविण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ अभिजित राउत यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की , अंध विद्यार्थ्यांनी आनंदाने जीवनात प्रकाश निर्माण करावा . असे आव्हान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुचिता भुरे यांनी केले.

