
अर्धापूर| तालुक्यातील कामठा (बु ) येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा दि 14 रोजी मंगळवारी सुरू होत असून दि 21 रोजी महाराष्ट्र भूषण ह.भ. प. अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या काल्याचे कीर्तनाचे समारोप होणार आहे.

या सप्ताह मध्ये दररोज काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, श्रीमद् भागवत कथा, हरिपाठ धूप आरती, हरी किर्तन व हरी जागर होणार आहे. यामध्ये कीर्तनकार पांडुरंग महाराज इटलापुरकर, प्रकाश महाराज साखरे, कृष्ण महाराज मोरे परभणी, भगवान महाराज शेंद्रेकर, महेंद्र महाराज मस्के पुसदकर, नामदेव महाराज कपाळ सोनपेठकर, रोहिदास महाराज मस्के गंगाखेडकर हे राहणार आहेत. दि 20 रोजी सोमवारी भागवत सांगता व श्रीच्या पालखीची मिरवणूक व नगर प्रदक्षिणा व रात्री दीपोत्सव होणार आहे.

दि 21 रोजी उपसरपंच रणजीतसिंघ कामठेकर व सतीश व्यवहारे यांनी महाप्रसाद ठेवला असून सर्व जनतेनी श्री खंडोबा मंदिर येथे उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन सप्ताह कमिटीने केले आहे.

