
नांदेड। अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या, नादब्रह्म संगीत क्लासेस धर्माबाद चा संचालिका सौ. राजेश्वरी बालाजी होटृॆ काळे मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले असून या यशाबद्दल अभिनंदन होत आहे.

हु. पानसरे हायस्कूल येथे संपन्न झालेल्या नोव्हें-डिसें सत्रात खालील विद्यार्थ्यांचे यश, प्रारंभिक परीक्षा गायन कु. दुर्गा जैरमोड, प्रथम धनश्री यडपलवार, यशस्वी पाटील, अपुलोड अंतरा, येरावार स्नेहल, अय्यर आरुशी,कटकेअक्षता, गिरी यशोदा, श्रृती गोविंदलवार, पाटील शाश्वती, पललवाड मृणालि, नलवार नभा, गायकवाड तृप्ती, शिंदे कृतीका. प्रवेशिका प्रथम-कु.महिमा मठपती, अक्षरा निलावार,अंतरा निलावार, कासट आदिश्री, शिवानी उपरे, संगावार मानसी, शांभवी स्वामी, प्रवेशिका पूर्ण-कु. रटकलकर सुदिक्षा, कांबळे पौर्णिमा.

तसेच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय मुख्याध्यापक श्रीमती. चुडावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थीनींचे गायन क्षेत्रात यश संपादन केले. या परीक्षेसाठी विश्वनाथ पाटील बन्नाळीकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या,केंद्र संचालक बालाजी सुवर्णकार विठ्ठल सुवर्णकार, सौ. शैलजा बोटलावार ,सौ. मिना नलवार मँडम आदींनी परीश्रम घेतले.

