मुखेड। रत्नागिरी जिल्ह्रातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांनी रिफायनरी प्रकल्प विरोधात बातमी दिल्यामुळे अंगावर चारचाकी वाहन घालून जाग्यावर ठार मारल्याच्या निषेधार्थ मुखेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसिल समोर दि. 10 फेब्रवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता काळया फिती लाऊन निदर्शने करण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्रातील राजापूर येथील दैनिक महानगरी टाईम्सचे पत्रकार शशिकांत वारीशे यांनी रिफायनरी विरोधात वृत्त दिले होते. त्यामुळे राजापूर हायवे येथे रिफायनरी समर्थक जमीन दलाल यांनी शशिकांत वारीशे यांच्या अंगावर वाहन घालून ठार केले. आरोपींवर 302 कलम अन्वये गुन्हा दाखल सदर खटला जलदगती न्यायालयात वतीने दाखल करुन आरोपीस फाशी देण्यात यावी व पत्रकार संरक्षण कायदा कडक करुन पत्रकारांना योग्य न्याय दयावा तसेच राज्य सरकारच्या वतीने कुटुंबास 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी.
राज्यात पत्रकारावर असे हल्ले करुन ठार मारले जात असतानाही अद्याप सरकारने आरोपीविरोधात ठोस भूमिका घेतलेली नाही. ही निंदनीय बाब आहे. पत्रकारावर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे. असेच हल्ले होत राहिल्यास पत्रकार राज्य सरकारच्या कारभाराच्या विरोधात राज्यभर आंदोलन करतील असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
यावेळी मुखेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर पाटील, विजय सचिव बनसोेडे, राजेया बंडे, ज्ञानेश्वर डोईजड, अॅड संदिप कामशेट्टे, शिवकांत मठपती,अॅड आशिष कुलकर्णी,भास्कर पाटील पवार, नामदेव श्रीमंगले, संदिप पिल्लेवाड,रामदास पाटील,महेताब शेख,रियाज शेख,संजय कांबळे, बबलु मुल्ला,हाफिज पठाण,शरद जोगदंड,श्रावण नरबागे,प्रदिप कांबळे यांच्या स्वाक्ष-या आहेत.