
हिमायतनगर| राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांची निघृन हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबियांना शासनाने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी करत पत्रकार वारीशे यांच्या हत्याकांडाचा हिमायतनगर तालूका पत्रकार संघाच्या वतीने तिव्र निषेध नोंदविण्यात आला आहे.

पत्रकारांवर करण्यात आलेला हल्ला हा निषेधार्थ असून, या ठिकाणी समाज कंटकानी नियोजित पद्धतीने सदरचे पत्रकार शशिकांत वारीशे यांचा हत्याकांड घडवून आणला आहे. त्यामुळे या घटनेच्या दोषींवर कडक कारवाई करून हत्याकांडात मयत झालेल्या वारीशे यांच्या कुटूंबातील व्यक्तीना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थिक मदत करावी. अशी मागणी तालूका दंडाधिकार्यामार्फत शासनाला निवेदन निषेध नोंदविण्यात येवून करण्यात आली आहे.

निवेदनावर जिल्हासंघटक प्रकाश जैन, नांदेड जिल्हा डिजिटल मिडीयाचे कार्याध्यक्ष अनिल मादसवार, तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ शिराणे, परमेश्वर गोपतवाड, कानबाराव पोपलवार, ज्ञानेश्वर पंदलवाड, गोविंद गोडसेलवार, सोपान बोंपीलवार, परमेश्वर शिंदे, दिलीप शिंदे, अनिल भोरे, शुद्धोधन हनवते, धम्मपाल मुनेश्वर, अनिल नाईक, संजय मुनेश्वर, परमेश्वर सूर्यवंशी, मनोज पाटील, के. एम. कवडे, नागेश शिंदे, दावू गाडगेवाड, गणपत नाचारे, आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

