
नांदेड| कर्नाटक राज्यात नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये मदन वसंता राठोड यांनी नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केले असून त्यांची निवड नेहरु युवा केंद्राच्या वतीने करण्यात आली होती.

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय स्तरावर युवा सक्षमीकरणासाठी कर्नाटक राज्यातील हुबळी (धारवाड) येथे दि. १२ ते १६ जानेवारी २०२३ या कालावधीत युवा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवामध्ये नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी नेहरु युवा केंद्राचे राष्ट्रीय स्वयंसेवक तसेच जगदंबा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी यवतमाळ येथे अंतिम वर्षात शिक्षण घेणारे मदन वसंता राठोड यांची निवड करण्यात आली होती.

त्यांनी नांदेड जिल्ह्याचे योग्यप्रकारे प्रतिनिधीत्व केल्याबद्दल वनमालाताई राठोड, हिरा राठोड, सवाईराम राठोड (नाईक), सोनाबाई राठोड, तुकाराम राठोड, प्रेम चव्हाण (नाईक), नामदेव राठोड, लवकुश जाधव, तुषार राठोड यांच्यासह आदी जणांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

