
उस्माननगर| येथून जवळच असलेल्या पोखरभोसी ( ता. लोहा) येथे दि. १४ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०२३ दरम्यान श्री. गुरुवर्य वैकुंठवासी मामासाहेब मारतळेकर यांच्या कृपाशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मौजे पोखरभोसी येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री गाथा पारायण, श्रीमद् भागवत कथा व लक्ष्मण शक्ती सोहळ्याचे (वर्ष ४2 वे ) आयोजन करण्यात आले आहे.

अखंड हरिनाम सप्ताह तील दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकडा, सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, दु. १२ ते ४ श्रीमद् भागवत कथा, सायं. ५ ते ६ हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरिकिर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्ञानेश्वरी गाथा व्यासपीठ ह.भ.प.यादव महाराज डांगे, ह.भ.प. प्रकाश महाराज डांगे, ह. भ. प. दत्ता सोपान ताटे, नित्य हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे.

या अखंड हरिनाम सप्ताहात किर्तनकाराचे पुढिल प्रमाणे किर्तन होणार आहे. दि.१४ फेब्रुवारी मंगळवारी रात्री श्री. ह.भ.प. रंगनाथ महाराज ( पोखरभोसीकर ), दि. १५ फेब्रुवारी रोज बुधवार रात्री ह.भ.प. नागोराव महाराज भोसले (गुरुजी ) सोनखेड, मानखेड), दि. १६ फेब्रुवारी रोज गुरूवार रात्री श्री.ह.भ.प. बापूसाहेब महाराज मोरे देहूकर (श्री तुकाराम महाराजांचे १० वे वंशज ) दि. १७ फेब्रुवारी रोज शुक्रवार रात्री श्री.ह.भ.प. नामदेव शास्त्री महाराज जामकर, दि. १८ फेब्रुवारी रोज शनिवार रात्री ह.भ.प. ज्ञानोबा माऊली ( अरबूजवाडीकर ), दि. १९ फेब्रुवारी रोज रविवार ह. भ. प. किशोर महाराज सुर्यवंशी( लातूरकर),

दि.२० फेब्रुवारी रोज सोमवार विजयानंद महाराज सुप्पेकर यांचे किर्तन व याच दिवशी दुपारी १२ ते 2 वाजेपर्यंत महापुजेचे किर्तन व सायंकाळी लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम निष्काम सेवा मंडळातर्फे होईल. दि.२१ फेब्रुवारी रोज मंगळवार ह्या दिवशी ह.भ.प.ज्ञानोबा माऊली मुढेकर यांचे सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत काल्याचे किर्तन होईल व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या अखंड हरिनाम सप्ताहास उपस्थित रहावून किर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन पोखरभोसी येथील भक्त मंडळीने( नागरिकांनी )केले आहे.

