
हदगाव/तामसा, गजानन जिदेवार। मौजे राजापुर येथील पत्रकार शशीकांत वारीशे यांच्या अंगावर दिवसा ढवळ्या वाहन घातल्याने त्यांच्या उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

त्यांच्या मुत्युस कारणीभूत असलेल्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करावी या मागणीसाठी हदगांव तालुका पत्रकार संघाच्या वतीने हदगांव तालुक्याचे तहसीलदार जिवराज डापकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना शुक्रवार दहा फेब्रुवारी रोजी हदगाव येथील सर्व पत्रकारांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला.

यावेळी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुनील व्यवहारे, हदगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पंडितराव पतंगे, प्रभाकर दहिभाते, सचिन मुकटकर, शितल भांगे, ज्योतिबा भांगे, यादव सुकापुरे, दुर्गा भारती, गजानन सुकापुरे,शेख चांद पाशा, गजानन जिद्देवार, मारोती काकडे, महेंद्र धोंगडे, हिमांशू इंगोले, सिद्धार्थ वाठोरे,शेख शहबाज, गजानन गिरी, वैजनाथ गुडुप, मनोज कदम, अब्दुल्ला चाऊस, युधिष्ठिर देवसरकर यांच्या सह हदगांव तालुक्यातील पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

