
नांदेड| बेलानगर तरोडा खु.येथील राष्ट्रमाता विद्यामंदिर ही शाळा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी शाळा असल्याचे प्रतिपादन चला हवा येऊ द्या फेम हास्य कलाकार सतीश कासेवार यांनी व्यक्त केले.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात राष्ट्रमाता विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम भावसार चौक येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात पार पडला यावेळी कार्यक्रमाच्याअध्यक्षा मा. नगरसेविका सौ ज्योतीताई कल्याणकर उद्घाटक श्री. हनुमंत लोंढे, प्रमुख पाहुणे चला हवा येऊ द्या फेम सतीश कासेवार, संस्थेचे उपाध्यक्ष उद्धव क्षीरसागर, संस्थेचे संचालक वेदांत क्षीरसागर,सत्यम क्षीरसागर, प्रमुख पाहुणे श्रीपत पाटील शिंदे, गंगाधर मोरे इ. उपस्थित होते.

दोन्ही तरोड्यांमधील राष्ट्रमाता शाळेने आजवर अनेक विद्यार्थी घडविल्यामुळे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो असे प्रतिपादन राष्ट्रमाता इंदिरा गांधी शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत लोंढे यांनी केले.तर चला हवा येऊ द्या फेम सतीश कासेवार यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर आपल्या कलागुणांना वाव देणे गरजेचे आहे कारण कलाक्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या सुवर्णसंधी दडलेल्या आहेत मी आपल्यासारखाच एक विद्यार्थी होतो परंतु मी माझ्या कलागुणांना नेहमी वाव देतराहिलो त्यामुळेच आज महाराष्ट्रातील सर्वांचा आवडता कार्यक्रम चला हवा येऊ द्या या मध्ये नांदेडचे नाव राज्यभर नेऊ शकलो याचा मला अभिमान आहे असे मत सतीश कासेवार यांनी व्यक्त केले.

यावेळी शाळेच्या स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये कु. गुंजन युवराज पाटील ,पवन संतोष कांबळे ,यश बोरुळकर प्रणव संजय पाटील या विद्यार्थ्यांचा पालकांसह गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर जाधव यांनी विद्यार्थी घडवित असताना आम्ही नेहमी त्यांच्या उज्वल भवितव्याचा विचार मनात ठेवून त्यांना विविध क्षेत्रात कसे पुढे नेता येईल याकरिता कार्य करीत असल्यामुळेच आज अनेक विद्यार्थ्यांना यशस्वी होताना पाहू शकत आहोत.

त्यामुळे सर्व उपस्थित विद्यार्थी व पालकांना सांगू इच्छितो आता शिक्षणाशिवाय पर्याय नाही हीच गोष्ट लक्षात ठेवून आपण तत्पर राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार सहशिक्षक चंद्रकांत क्षीरसागर यांनी मानले. सहशिक्षक सुनील जोंधळे गजानन जाधव, सुरेखा गिरी यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सुरेख नियोजन लावले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पाटील यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल परिसरातील पालकांनी विशेष कौतुक केले.

