नांदेड| डॉ. मीनलताई पाटील खतगावकर तंत्रज्ञानाच्या आणि धावपळीच्या युगात जीवनमान अत्यंत धावपळीचे झाले आहे. तरी सर्व नागरिकांनी रस्ता सुरक्षा संदर्भात गांभीर्याने विचार करून सर्वांनीच रस्ता सुरक्षा हे आपले कर्तव्य आहे असे मानले पाहिजे. असे उद्गार कै.गणपतराव पाटील बहुद्देशीय सेवाभावी संस्था मांजरमच्या वतीने आयोजित सात दिवसीय रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर मीनलताई निरंजन पाटील खतगावकर यांनी व्यक्त केले.
कित्येक तरुणांचे अपघात होतात. वाहतुकीचे नियम पालन करणे. बेदरकार गाड्या चालवणे. नशा पान करून गड्या चालवणे. दुचाकी गाडीवरती हेल्मेट न वापरणे. चार चाकी वाहनावरती सिरपेट न बांधणे. रस्त्यावरील वेगवेगळ्या चिन्हांचे निरीक्षण करून नियम न पाळणे. अशा अनेक गोष्टीमुळे अपघाताला सामोरे जावे लागते यामुळे कित्येक कुटुंब उध्वस्त होतात असे त्या पुढे म्हणाल्या.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी अविनाशजी राऊत साहेब व श्री संदीप जी निमसे साहेब यांनी सुद्धा शालेय विद्यार्थी आणि गावातील नागरिकांना वाहतुकीच्या नियमाविषयी अमूल्य असे मार्गदर्शन केले. संस्थेच्या वतीने सकाळी प्रथम शालेय विद्यार्थी व नागरिकांच्या उपस्थितीत “वॉक ऑन राईट तिरंगा” रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांच्या या रॅलीने व रस्ता सुरक्षेच्या संबंधित घोषणा वाक्यांनी सर्व परिसर अक्षरशः दुमदुमून निघाला.
सदर कार्यक्रमात माननीय श्री अविनाजी राऊत साहेब उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड व माननीय श्री संदीप जी निमसे साहेब प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड. उप पोलीस निरीक्षक येवले साहेब पोलीस स्टेशन कुंटूर.संस्थेचे अध्यक्ष श्रीपत संभाजी पाटील शिंदे. शिवाजी पाटील जाधव माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कुंटूर. मनोहर पवार साहेब माजी सभापती पंचायत समिती नायगाव. सुनील भाऊ राठोड. पुंडलिकजी नवारे.विलास पाटील कदम सोमठाणकर. व्यंकट पाटील कदम.जीवन पाटील चव्हाण. दिपकराव पावडे नांदेड. बाळकृष्ण शिंदे पाटोदेकर.शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर. जाधव सर. वरपडे मॅडम
संस्थेच्या वतीने मागील सतत सात दिवसापासून वेगवेगळ्या शाळांमध्ये रस्ता सुरक्षा या विषयावरील निबंध स्पर्धा. चित्रकला स्पर्धा. वक्तृत्व स्पर्धा. घेऊन रस्ता सुरक्षा सप्ताह 2023 ची सांगता श्री संत बाळू महाराज हायस्कूल कहाळा खुर्द येथे करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अण्णापुरे सरांनी केले तर आभार वि. आर. शेळके सरांनी मानले.