हिमायतनगर, परमेश्वर काळे| येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर यात्रा उत्सव समितीच्या सबकमेटीची निवड नुकत्याच संपन्न झालेल्या बैठकीत करण्यात आली. यात सर्वानुमते अध्यक्षपदी जेष्ठ संचालक लक्ष्मण शक्करगे, उपाध्यक्षपदी सुभाष शिंदे तर सचिव पदी अनिल भोरे यांची निवड करण्यात आली आहे.
दरवर्षी महाशिवरात्री निमित्त हिमायतनगर येथील प्रसिद्ध श्री परमेश्वर मंदिर परिसरात यात्रा उत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी दि.१६ फेब्रुवारी पासून सुरुवार होणाऱ्या यात्रेचे काटेकोर नियोजन करण्यासाठी परमेश्वर मंदिरात संचालक व गावकरी नागरिकांच्या बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वानुमते यात्राउत्सव सब कमिटीच्या अध्यक्षपदी जेष्ठ नागरिक तथा ट्रस्टचे जेष्ठ संचालक लक्ष्मण शक्करगे, उपाध्यक्षपदी सुभाष शिंदे तर यांची पुनश्च्य निवड करण्यात आली.
तसेच सचिव पदी अनिल भोरे तर सदस्यपदी संतोष गाजेवार, मारोती शिंदे, गजानन चायल, दिलीप पार्डीकर, गजानन पाळजकर, विठ्ठल ठाकरे, ज्ञानेश्वर शिंदे, हनुसिंग ठाकूर, गणेशराव शिंदे, विकास नरवाडे, सुनील चव्हण, बाबुराव होनमने, उदय देशपांडे, अन्वर खान, दत्तात्रेय काळे, ज्ञानेश्वर पॅलिकोंडलवार, राम सूर्यवंशी, संदीप तुप्तेवार आदींचा समावेश आहे.