Tuesday, March 21, 2023
Home क्रीडा राज्यस्तरीय बॉल बॕडमिंटन चॕम्पियनशिप ,मुलांमध्ये अमरावती तर मुलींमध्ये पुणे महानगर विजयी -NNL

राज्यस्तरीय बॉल बॕडमिंटन चॕम्पियनशिप ,मुलांमध्ये अमरावती तर मुलींमध्ये पुणे महानगर विजयी -NNL

by nandednewslive
0 comment

नांदेड। जिल्हा क्रीडा संकुल, नांदेड येथे दिनांक ६ ते ९ फेब्रुवारी २०२३ दरम्यान आयोजित ६७ व्या महाराष्ट्र स्टेट बॉल बॕडमिंटन चॕम्पियनशिप २०२३ या स्पर्धेचे ९ फेब्रुवारी रोजी ईतवारा पोलीस स्टेशन नांदेड येथे बक्षीस वितरण सोहळा इतवारा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे ,सय्यद मोईन, राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ पि.के .पटेल, महासचिव श्री अतुल इंगळे, डि.एस गोसावी या चांगल्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी मुलांमध्ये अमरावती तर मुलीमध्ये पुणे महानगर विजयी झाले आहेत.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यातून जवळपास ३०० मुली , ३०० मुले व १०० पंच,प्रशिक्षक व पदधिकारी सहभागी झाले होते. तीन दिवसापासून अतिशय उत्साहाने होत असलेल्या या भव्य दिव्य राज्यस्तरीय स्पर्धेच्या मुलांच्या अंतिम सामन्यात अमरावती जिल्हा संघाने पुणे महानगर संघाला नमवित तर मुलींच्या अटितटीच्या सामन्यात पुणे महानगर च्या मुलींच्या संघाने वर्धा संघाला नमवित राज्यस्तरीय स्पर्धेचे अजिंक्यपद प्राप्त केले,तर मुलात अनुक्रमे पुणे महानगर द्वितीय , हिंगोली व पुणे हे तृतीय तसेच मुलींमध्ये वर्धा द्वितीय , पुणे व भंडारा यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मध्ये ३२ जिल्ह्यातील एकूण ६० जिल्हा संघांनी सहभाग नोंदविला.आज पर्यँत बॉल बॅडमिंटन चा इतिहासातील संघ सहभागाचा हा विक्रम ठरला ,असद स्पोर्ट्स अकॅडमी अहमदपूर जिल्हा लातूर यांच्याद्वारे आयोजित या अजिंक्यपद स्पर्धा मोईन सय्यद व पोलीस उप निरीक्षक असद शेख व त्यांचा संपुर्ण खेळाडू व सहकारी यांचा उ त्तम नियोजनात उत्कृष्ठ राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले. निवास व्यवस्था भोजन व्यवस्था उत्कृष्ठ प्रदान करण्यात आली.मैदान उत्कृष्ठ उपलब्ध करून दिले. आज पर्यन्त स्मरणीय राज्य अजिंक्यपद स्पर्धे पैकी ही एक राज्य अजिंक्यपद स्पर्धा नक्कीच आहे. चार दिवसीय या राज्य अजिंक्यपद स्पर्धे मध्ये कुठलीही उणीव भासली नाही. अविस्मरणीय आयोजना बद्दल राज्य संघटनेने असद शेख व मोईन सय्यद यांचे शतशः आभार मानले.

banner

अतिशय कमी वेळा मध्ये या स्पर्धा आयोजित करण्यात आला. असद शेख यांनी संघटनेच्या विनंतीस मान देउन स्पर्धा आयोजित केला त्याबद्दल संघटना ऋणी असल्याचे डॉ .पटेल व अतुल इंगळे यांनी म्हटले आहे.. राज्य संघटनेने अध्यक्ष पी. के. पटेल कार्याध्यक्ष गोसावी, उपाध्यक्ष डॉ कवीश्वर उपाध्यक्ष व निरीक्षक राज्य अजिंक्यपद स्पर्धा भांडारकर उपाध्यक्ष ऋषिकांत पापडकर कोषाध्यक्ष श्री विजय पळसकर खंगार सहसचिव डॉ हरीश काळेसहसचिव सौगत दत्ता सहसचिव परेश उपकरे सदस्य घोलप , सहारे पाटील यांचा मार्गदर्शना खाली उत्कृष्ठ रित्या संपन्न झाला.

राज्य संघटनेचे हृदय म्हणजे रेफरी बोर्ड श्री सौगत दत्ता (सहसचिव व अध्यक्ष रेफरी बोर्ड) यांचा नेतृत्वात व श्री मनीष इंगोले संयोजक योगेश काटोके सदस्य यांचा सहकार्या मुळेच तसेच सर्व नवीन व अनुभवी रेफरी यांचे अथक परिश्रम व उत्साह वेळेला किंमत देत कुठलीही अडचण न दाखवता राज्य अजिंक्यपद स्पर्धा यशस्वी करण्यात सिंहाचा वाटा आहे. जवळ पास १२० मॅचेस पाच कोर्ट मध्ये तीन दिवसा मध्ये पार पडला.

राज्य अजिंक्यपद स्पर्धा यशस्वी करण्यात इम्रान खान, अब्दुल बारी , बाबा शेख, अय्युब सर, अर्शद शेख, अदनान शेख, तानाजी कदम, फैजान शेख, मनिषा सुर्यवंशी , विकास जायभाये व अहमदपूर येथील सर्व खेळाडूंचा सिंहाचा वाटा आहे. खेळ व खेळाडूंसाठी अतिशय उच्च सोयी सुविधा उपलब्ध करून दर्जेदार स्पर्धा आयोजन केल्या बद्दल सर्व खेळाडू व जिल्हा संघटना यांनी आंतरराष्ट्रीय खेळाडू व नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस उप निरीक्षक असद शेख यांचे अभिनंदन करीत आभार मानले.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!