
श्रीक्षेत्र माहूर,राज ठाकूर। माहुर येथे परभणी जिल्ह्यातील चारठाना येथील पदयात्रे सोबत आलेल्या फुलाबाई चीनकीराम मोरे (वय ५० वर्षे) व नर्मदा प्रकाश पजई (वय ३० वर्षे) या मयालेकीचे मृतदेह सुमारे दोन किमी अंतरावरील पांडवलेणी तलावात तरंगताना आढळले.

परभणी जिल्ह्यातील दिनकरराव देशपांडे महाराज यांचे मार्गदर्शनात दि.३ फेब्रु.रोजी सुमारे ६५ भाविकांची पदयात्रा चारठाना ते श्रीक्षेत्र माहूर करीता निघाली.या पदयात्रा दिडिंत फुलाबाई मोरे यांची मुलगी नर्मदा पजई व तीची ३ वर्षाची मुलगी हयाचा पदयात्रेत सहभाग होता सदरील पदयात्रा दि.९ फेब्रु.रोजी माहूरला पोहचली.दिवसभर देव देवतांचे दर्शन घेतले.त्यानंतर रात्रीला शहारातील श्री रेणुकाभक्त निवास धर्मशाळा व विष्णूकवी मठात त्यांनी मुक्काम केला. दि.१० फेब्रु.रोजी पदयात्रा परत निघाण्याच्या तयारीत असतांना मयत नर्मदाची तीन वर्षीय मुलगी ऐकटिच दिसून आली.

मात्र त्या दोघी मायलेकी दिसून आल्या नसल्याने सर्वत्र शोध घेतला मात्र कूठेही दिसून न आल्याने .शेवटी पोलिसांना सूचना देण्यात आली. शोधाशोध चालू असतांना लांजी येथील शेतकरी अंबादास कमठेवाड यांनी सदर तलावात एक प्रेत तरंगत असल्याची पोलिसांना सूचना दिली.पोलीसांनी पदयात्रे सोबत असलेल्या बाळासाहेब किसनराव झाडे रा.धानोरा यांना घेउन घटनास्थळी धाव घेतली असता सदरील मुत्यदेह फुलाबाई चे असल्याचे सागितले ह्यामुळे तलावात नर्मदा चा शोध घेतला असता तिचाही मुत्यदेह पाण्याखाली आढळला.

पंचनामा करून दोन्ही प्रेत ग्रामीण रुग्णालयात आणले व शवविच्छेदन करण्यात आले सदर घटनेची माहूर पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून. पो. नि. नामदेव रिठ्ठे यांचे मार्गदर्शनात जमादार आनंद राठोड व पोहेकॉ सुशील राठोड हे पुढील तपास करीत आहेत. शहरानजीक मातृतीर्थ तलाव, भोजन्ती तलाव व अनेक कुंड असतांना त्या दोघी मायलेकी तिथे का गेल्या आणि कुणासोबत गेल्या ह्या बाबत नागरीकांत तर्क वितर्क सूरु आहे.

