
उस्माननगर, माणिक भिसे। उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील ज्येष्ठ पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ येथील उस्माननगर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी सपोनि भारती यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.

मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ व पत्रकारावर वारंवार होत असलेल्या हल्याच्या निषेध करण्यासाठी व आरोपीला फाशीची शिक्षा द्या मयत पत्रकाराच्या कुटूंबियांना 50 लक्ष रु ची तात्काळ मदत करा आशा आशयाचे निवेदन ११ फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन उस्माननगर यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांनी बातमी का छापली म्हणून गाडी खाली घालून निर्घृण हत्या करण्यात आली. त्या घटनेच्या निषेधार्थ व पत्रकारांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्याच्या निषेध करण्यासाठी ११ फेब्रुवारी रोजी र निवेदन देण्यात आले. त्याच अनुषंगाने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने सपोनि पांडुरंग भारती यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी पत्रकारांनी उपस्थित बीट जमादार भारती यांना निषेधाचे निवेदन देवून मयत पत्रकार वारिशे यांच्या कुटुंबास शासनाने 50 लक्ष आर्थिक मदत करावी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सहकोषाध्यक्ष तथा उस्माननगर पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली निषेधार्थ चे निवेदन देण्यात आले यावेळी उपाध्यक्ष माणिक भिसे , प्रदीप देशमुख , लक्ष्मण कांबळे , सुर्यकांत मालीपाटील ,लक्ष्मण भिसे , अमजदखान पठाण , देविदास डांगे , विठ्ठल ताटे पाटील ,यांची उपस्थिती होती

