
नांदेड/किनवट/इस्लापूर/शिवणी। किनवट तालुक्यातील मौजे येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना लक्ष करीत, वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना माहीती का देता असं म्हणुन कोणताही गुन्हा दाखल नसताना इस्लापूर येथील पोलीस अधिकाऱ्यांनी मारहान केली असल्याची तक्रार नांदेड विभाग गोरक्षा प्रमुख, विश्व हिंदु परिषद देवगीरी प्रांतच्या वतीने देण्यात आली आहे.

दि 01 फेब्रुवारी रोजी तल्लारी येथुन 3 वळु कत्तलीला जात असल्याची माहिती कार्यकर्त्यांना मिळाली, लगेच ती माहीती मा पोलीस अधीक्षक साहेबांना व शेवाळे सरांना कळवली होती. स्थानिक पोलीस बेरेचवेळा कार्यकर्त्यांवरच दबाव आणून कसायांकडुन पैसे घेऊन गुन्हा दाखल न करताच गाड्या सोडतात. तसाच प्रकार दिनांक 1 फेब्रुवारीच्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या गाडीवर तामसा पोलीस स्टेशन अंतर्गत यापुर्वीच 1 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर याच गाडीमालकावर यापुर्वीचे 2 गुन्हे दाखल आहेत, याची माहिती तक्रारकर्ते किरण बिच्चेवार नांदेड विभाग गोरक्षा प्रमुख, विश्व हिंदु परिषद देवगीरी प्रांत यांनी स्वतः श्री शेवाळे सरांना दिल्यावर देखील श्री शेवाळे यांनी कसायांची कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही. ऊलट घटनास्थळावरून 7-8 कसायांना पळुन जाण्याची खुली सुटच दिली. आणि आपल्या कार्यकर्त्यांना पोलीस गाडीत 3 डांबुन ठेवले.

ही कारवाई अशा ठीकाणी पार पडली जिथे कसल्याही प्रकार कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसता, आम्ही पोलीसांना मदत करण्याच्या शुध्द हेतुने पुढे आलोत. हे सर्व माहिती आम्ही वरीष्ठ अधिकाऱ्यांना कळवली होती, तरीही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली नसल्याने आम्हाला एका मंत्र्यांची मदत घेऊन प्रशासनास गुन्हा दाखल करण्यास भाग पाडावे लागले. पोलीस प्रशासन स्वतः कारवाई करत नाही, आणि आम्ही पुढे निघालो तर आम्हाला नोटीसा बजावल्या जातात. या प्रकरणी देखील आम्हाला नोटीसा बजावल्या आहेत, यापुढेही पोलीस कारवाई करणार नसतील तर आमच्यावर गुन्हे दाखल केले तरीही बेहतर पण आम्ही गोवंशाची कत्तल व तस्करी होऊ देणार नाही. असेही निवेदनात लिहिले आहे.

नंतर दि 04 फेब्रुवारी 2023 रोजी शिवणीच्या यात्रेत तरूणांचे भांडण झाले, त्या भांडणात किमान 60 ते 70 जणं असतांना देखील गोरक्षणाच्या कारवाईत सहभागी तरूणांना निवडुन दि 05 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9 वाजता पोलीस स्टेशनला बोलावले व सकाळी 10 तरूणांना कोणत्याही प्रकारची चौकशी न करता कपडे काढून तल्लारी गावच्याच नागरीकांसमोर बेकायदेशीर मारहाण करून अपमाणीत केले. हा सर्व प्रकार शेवाळे यांनी 1 तारखेला नाविलाजास्तव दाखल करावा लागलेल्या गुन्ह्याचा रोष मनात ठेऊनच मारहाण केली असल्याचे म्हंटले आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, आम्ही पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मानवाधिकार आयोग, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी नांदेड, पोलीस अधीक्षक नांदेड, अतिरीक्त पोलीस अधीक्षक भोकर सर्वांना निवेदनाव्दारे तक्रार दीलेली आहे. जोपर्यंत मनात आकस ठेवुन बेकायदेशीर मारहाण करणाऱ्या श्री शेवाळे यांना निलंबित केले जात नाही तोपर्यंत संबंध महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येईल.

पोलीस प्रशासन जर स्वतः प्राणी संरक्षण अधिनियम 1995 /( सुधारीत ), प्राणी अत्याचार अधिनियम, राज्य परीवहन कायदा, आणि महानगरपालिका कायद्याची अंमलबजावणी करावी अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल. आणि होणाऱ्या परीस्थितीस पोलीस प्रशासन जबाबदार असेल. असे या निवेदनात म्हंटले असून, यावर किरण बिच्चेवार, नांदेड विभाग गोरक्षा प्रमुख, विश्व हिंदु परिषद देवगीरी प्रांत, शशिकांत पाटील, विहीप जिल्हा मंत्री, श्रीराज चक्रावार, विहीप महानगर मंत्री, गणेश कोकुलवार, विहीप महानगर मंत्री, गणेश यशवंतकर, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक, मनोज मामीडवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाच्या प्रति पोलीस महासंचालक, गृहमंत्री, गृहसचिव, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदींना देण्यात आले आहे.

