हिमायतनगर। तालुक्यात ग्रीड पाणी पुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात झाली असल्यामुळे अनेक गावचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न सुटला असुन गेल्या अनेक वर्षापासून कारला गाव या योजनेपासून वंचित होते या गावाचा समावेश योजनेत असुन कामाला सुरुवात झाली त्यामुळे गावचा भविष्यातील पाणी टंचाईचा प्रश्न या योजनेतून अखेर सुटणार असल्याचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी सांगितले आहे.
कारला गावाला गेल्या काही वर्षांपासून पाणी पुरवठा योजना नसल्यामुळे गावात पाणी टंचाई चा प्रश्न उद्भवत होता.येथील ग्रामपंचायत सरपंच सदस्यांनी कायमस्वरूपी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडे धाव घेऊन मागणी केली होती. आ. जवळगावकर यांनी सदरील प्रश्न लक्षात घेऊन तात्काळ कारला गावाचा ग्रीड पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट करून दिला . सदरील ग्रीड योजनेच्या पाईपालाईन खोदकामाला सुरुवात झाली आहे. त्या पाणी पुरवठ्याच्या कामाचे शनिवारी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. आ. जवळगावकर यांचा ग्रामपंचायत कडून सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी बोलतांना आ. जवळगावकर म्हणाले की कारला पिचोंडी ग्रामपंचायत च्या कार्यकाळात कायमस्वरूपी पाणी पुरवठा गावातील रस्ते , राजा भगीरथ सभागृहाचे काम प्रगतीपथावर सुरु आहे.येणाऱ्या काळात सिमेंट रस्त्याच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून राहिलेले कामे देखील पूर्ण करून देण्याचे आश्वासन आ. जवळगावकर यांनी दिले आहे. यावेळी यावेळी सुभाष राठोड, शेख रफिकभाई, राजीव झरेवाड, नितेश जैस्वाल,अश्रफ खान, सरपंच गजानन कदम, तंटामुक्तीचे अध्यक्ष डॉ गफार, सदस्य सोपान बोंपीलवार, उत्तम कोमावार, दत्ता चिंतलवाड, गजानन मिराशे, रामा मिराशे, अ. रज्जाक भाई,गजानन आचमवाड, बाकीभाई,आडेलू चप्पलवाड, ओम मोरे, बालाजी एटलेवाड, यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.