नांदेड। नांदेडचा भूमिपुत्र आदित्य विकासराव देशमुख यांची निर्मिती आणि नांदेडचेच हृषीकेश जोशी, विनय प्रतापराव देशमुख यांची सहनिर्मिती असलेल्या चित्रपटाने २१ वा पुणे आंतरराट्रीय फिल्म फेस्टिवल गाजवला !
एका कलाकाराचे भावविश्व साकारणारी फिल्म डायरी ऑफ विनायक पंडित, या सिनेमाला २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. डायरी ऑफ विनायक पंडित या सिनेमासाठी प्रोडक्शन डिझायनर म्हणून मयूर पवार व आर्ट डिरेक्टर म्हणून कुणाल वेदपाठक यांनी काम पाहिले.
मयूर शाम करंबळीकर दिग्दर्शित आणि आदित्य देशमुख,वेदांत मुगळीकर निर्मित आणि व्यंकट मुळजकर परभणी,हृषीकेश जोशी,विनय देशमुख,समीर सेनापती यांची सह-निर्मिती असलेल्या डायरी ऑफ विनायक पंडित ची कथा एका कलाकाराच्या डायरी भोवती फिरते. भूतकाळात आलेल्या अनुभवांना कंटाळून विनायक आत्महत्येस सरसावतो, पण आयुष्य त्याला एक संधी देते. नवीन आयुष्यात येणारी नवीन जसे छोटी वर्षा,जगदाळे सर, इतर यांच्या बोवताली विनायक चे आयुष्य फिरते.
या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अविनाश खेडेकर,सुहास शिरसाट,पायल जाधव,स्वाती काळे,प्रणव रत्नपारखी हे कलाकार आहेत तसेच बालकलाकार म्हणून आदित्य आणि युगा देशमुख यांची कन्या त्रिशा देशमुख हिचे देखील पदार्पण झाले आहे. चित्रपटाचे संगीत हे विशेष आकर्षण असणार आहे. अभय जोधपूरकर,मंगेश बोरगावकर, जयदीप वैद्य आणि प्रियांका बर्वे यांनी या चित्रपटात गाणी गायली आहेत तर संगीत दिग्दर्शन हे निरंजन पेडगावकर आणि आनंदीविकास यांनी केले आहे. नांदेड साठी अभिमानाची बाब म्हणजे महिला संगीतकार आनंदी विकास यांचे संगीत असलेले एक गाणे पदमश्री शंकर महादेवन यांनी गायले आहे.चित्रपटासाठी मयूर करंबळीकर,निरंजन पेडगावकर,दुर्गेश काळे यांनी गीतकार म्हणून काम पहिले. चित्रपटाची खासियत म्हणजे यात १९७०-१९८० चा काळ अनुभवायला मिळणार आहे.
21 व्या पुणे आंतरराट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये अंदाजे १६०० चित्रपटांमधून अंतिम ७ चित्रपटांमध्ये डायरी ऑफ विनायक पंडित ची निवड झाली होती. आणि दिनांक ३ फेब व ५ फेब २०२३ रोजी चित्रपटाचे सादरीकरण पुण्यातील पी व्ही आर आयकॉन आणि आयनॉक्स बंड गार्डन येथे सादरीकरण झाले आणि दोन्ही शो मिळून ५०० हुन अधिक प्रेक्षकांनी या याचित्रपटाचा आस्वाद घेतला.
चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्षण चे काम आदित्य देशमुख यांच्या पुण्यातील नामवंत अशा मीडियावर्क्स स्टुडिओ मध्ये झाले आहे तर चित्रीकरण पुण्यातील भांडारकर इन्स्टिटयूट, सातारा,रहिमतपूर,ब्रम्हपुरी अशा भागात पार पडले. लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल असे चित्रपटाच्या टीम कडून सांगण्यात आले.
विशेष बाब म्हणजे डायरी ऑफ विनायक पंडित या सिनेमाचे सादरीकरण १३ व्या यशवंत फिल्म फेस्टिवल मध्ये देखील या चित्रपटाची निवड केली गेली आहे याचे सादरीकरण मुंबई मध्ये दिनांक १५ फेब २०२३ रोजी होणार आहे. नांदेड आणि मराठवाड्यासाठी नक्कीच हे अभिनंदनीय आहे असे सर्वत्र बोलल्या जात आहे.