
नांदेड| नांदेड जिल्हा मार्शल आर्ट सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशन नांदेड व गोदावरी विद्यालय पिंपळगाव (निमजी)यांच्या संयुक्त विद्यमाने 25 दिवसीय निशुल्क कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच सहभागी झालेल्या मुला मुलींना संघटनेच्या वतीने प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीआय श्री अशोक घोरबांड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री एस व्ही डक संघटनेचे अध्यक्षा अनुराधा शिंदे बामणीचे सरपंच देविदास जाधव जी की गिरडे घटनेचे सचिव व मुख्य प्रशिक्षक एकनाथ पाटील सह प्रशिक्षक रमेश पवार हे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्यासमोर विद्यार्थ्याकडून चित्तथरारक प्रात्यक्षिके करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री एस व्ही डक यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री घोरबांड साहेब यांनी ग्रामीण भागातील मुला मुलींना कराटे या खेळाचे महत्व तसेच आपल्या शिक्षक या नात्याचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर त्यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गच्चे सर यांनी केले श्री विठ्ठल पाटील डक अध्यक्ष गीताई शिक्षण संस्था विजय नगर नांदेड चे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावर सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांना पुढील प्रशिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

