नविन नांदेड। सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेने वृत्तपत्र विक्रेतासाठी केलेले कार्य व सामाजिक बांधिलकी जोपसत असलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन नांदेड जिल्हा मराठी संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्या बदल आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी केले.
नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा अध्यक्षपदी गोवर्धन बियाणी व नांदेड महानगर अध्यक्षपदी शिवराज बिचेवार तर नविन नांदेड मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष पदी किरण देशमुख यांच्यी निवड झाल्याबद्दल नांदेड जिल्हा वृत्तपत्र विकास महामंडळ शाखा सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने ९ फेब्रुवारी रोजी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता ,यावेळी मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सतीश कदम, उपाध्यक्ष दिलीप ठाकूर, सचिव बालाजी सुताडे ,जेष्ठ विक्रेते दौलतराव कदम शेख सयोधदीन मदन सिंह चौहान, महिला वितरक वंदना लोणे,तातेराव वाघमारे, अमोल नांदेडकर,साई गोटमवार व डॉ.भिसे यांच्यी उपस्थिती होती.
यावेळी वृत्तपत्र विक्रेते यांच्याशी अडीअडचणी संदर्भात चर्चा केली तर गोवर्धन बियाणी यांनी सिडको वृत्तपत्र विक्रेते हे विविध उपक्रम राबवुन अनेक सामाजिक कार्य करत असल्याबद्दल पदाधिकारी यांचे अभिनंदन केले व टिन शेड बाबत सविस्तर चर्चा केली, व वृत्तपत्र विक्रेता यांच्या आडी अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगितले.