
नांदेड| जगद्गुरु संत श्री सेवालाल महाराज यांची पुण्यभूमी गोर बंजारा साजाची काशी तिर्थक्षेत्र पोहरागड येथे शासनाच्यावतीने ५९३ कोटींच्या विकास कामांचे भूमीपूजन दि. १२ फेब्रुवारी रोजी होत आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून सेवालाल महाराजांचे भक्त, संत महंत उपस्थित राहणार असून यावेळी लाखोंचा जनसागर उसळणार आहे. या कार्यक्रमास नांदेड जिल्ह्यातूनही समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नव भारत युवा संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा समाजभूषण लवकुश जाधव यांनी केले आहे.

गोरबंजारा धर्मपिठाचे पिठाधीश्वर प.पू. बाबुसिंग महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाचे नेते संजयभाऊ राठोड, डॉ. खा. उमेश जाधव, आ. निलयभाऊ नाईक, कर्नाटकचे मंत्री प्रभूजी चव्हाण, आ. तुषार राठोड, आ. राजेशभैय्या राठोड, आ. इंद्रनिल नाईक, अमरसिंग तिलावत, वर्षा चव्हाण, हिरा राठोड, संदीप आडे, अंकुश जाधव तसेच गोर बांजारासाठी आकराधाम निर्माते गोरधर्म प्रचारक किसनभाऊ राठोड, डॉ. मोहन चव्हाण, बी.डी. चव्हाण, विनोद चव्हाण यांच्या प्रयत्नातून श्री सेवालाल महाराज यांच्या पुण्यभूमीचा भव्य विकास कामांचा आराखडा तयार केला आहे.

याचा आनंद आणि उत्साह तमाम बंजारा समाजामध्ये आहे हा आनंद द्विगुणित करण्यासाठी व या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व गोरबंजारा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नव भारत युवा संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा समाजभूषण लवकुश मधुकर जाधव यांनी केले आहे.

