Friday, March 31, 2023
Home धार्मिक आर्य वैश्य समाजाचा भारतीय अमृत महोत्सवात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा असा तिरुपतीत होणार दुसरे अधिवेशन व भूमिपूजन सोहळा -NNL

आर्य वैश्य समाजाचा भारतीय अमृत महोत्सवात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा असा तिरुपतीत होणार दुसरे अधिवेशन व भूमिपूजन सोहळा -NNL

by nandednewslive
0 comment

नांदेड। महाराष्ट्र राज्यात आर्य वैश्य कोमटी समाज हा मूळ आंध्रप्रदेश मधून स्थलांतरित होऊन सुमारे 150 वर्ष पेक्षाही अधिकचा काळ गेलेला आहे. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होऊन आपण सर्व अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि या कार्यकाळात आर्य वैश्य कोमटी समाजाचं कुलदैवत सर्वांचे आराध्य असलेल्या श्री भगवान बालाजी यांच्या चरणापाशी म्हणजे श्री क्षेत्र तिरुपती या ठिकाणी आर्य वैश्य समाजाची हक्काची स्वतःची एक नवीन भव्य दिव्य 102 गोत्रातील समाज बांधव उभारणार आहेत.

असे भक्त निवास म्हणजेच महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे दुसरे अधिवेशन दिनांक 16 फेब्रुवारी रोजी होणार असून या अधिवेशनाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार हे उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री तथा आमदार मदन येरावार, तालिका सभापती तथा आमदार समीर कुणावार, श्री नगरेश्वर वैश्य मंदिराचे माजी अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, महासभेचे माजी अध्यक्ष एकनाथराव मामडे, डॉ. डी. आर. मुखेडकर, अखिल भारतीय आर्य वैश्य महिला महासभेच्या अध्यक्षा माधुरी कोले यांच्यासह महासभेचे पदाधिकारी उपस्थित राहतील.

तसेच महासभेच्या नियोजित महाराष्ट्र वासवी भवन तिरुपती या वास्तूच्या भूमिपूजनाची कोणशिला व भूमिपूजन समारंभ दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी राज्याचे वनमंञी सुधीर मुनगंटीवार, आमदार मदन येरावार, आमदार समीर कुणावार, राज्यसभेचे माजी सदस्य टी.जी. वेंकटेश, आंध्र प्रदेश पर्यावरण व्यवस्थापन महामंडळाचे अध्यक्ष गुब्बा चंद्रशेखर, आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील आमदार भूमन्ना करूणाकर, काशी अन्नसत्रंमचे विलास बच्चू, तिरुपती मनपाचे महापौर शिरीशा यादव, येलुरी लक्षमय्या, देवकी वेंकटेश्वरलू, भावनाशी श्रीनिवासा, पशुपती गोपीनाथ, डी. नरसीमल्लू, अॅड केसरला चंद्रशेखर, पी विकास, जी के रोनि, सुब्बा राजू, एन.शिवकुमार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, राज्यभरातील राज्य व जिल्हा कार्यकारणी मंडळाच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होणार आहे .

महाराष्ट्र राज्यामध्ये समाजाला दीडशे वर्षे पूर्ण होऊन ही महाराष्ट्राच्या हक्काची भव्य दिव्य वास्तू तिरुपतीत उभारण्याचे कार्य तो सुवर्णक्षण आता सत्यात उतरणार असून महाराष्ट्र राज्यातील आर्य वैश्य कोमटी समाज बांधव महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा या एका नावाशी एकरूप होऊन संघटित होऊन मजबूतपणे महासभेच्या सोबत उभा आहे. कार्यतत्पर कार्य कुशल आणि कार्यसम्राट अशा कितीतरी पदव्या कमी पडतील असे नेतृत्व नंदकुमार गादेवार यांच्या माध्यमातून आर्य वैश्य समाजाला लाभले आहे. त्यांच्यासोबतची सर्व टीम आणि सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने हा सुवर्ण अक्षरांनी नोंद करावा असा कार्यक्रम तिरुपती संपन्न होण्यासाठी आता सज्ज आहे.

या कार्यक्रमात उपस्थित राहून याची डोळा याची देही या उक्तीप्रमाणे जिल्हा कार्यकारणी मंडळातील पदाधिकारी सदस्य यांनी तिरुपती येथे येण्यासाठी जयत तयारी केली आहे. दि16 फेब्रुवारी 2023 महाराष्ट्र महासभेचे दुसरे जिल्हा कार्यकारणी मंडळाचे अधिवेशन आणि दिनांक 17 फेब्रुवारी भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे. तिरुपती येथे होणाऱ्या दुसऱ्या अधिवेशन आणि भूमिपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्यातून जवळपास एक हजार समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, महासचिव गोविंदराव बिडवई, कोषाध्यक्ष सुभाषराव कन्नावार, बांधकाम समितीचे अध्यक्ष भानुदास वट्टमवार,अनिल मनाठकर,,राज्यसंघटन प्रमुख प्रदीप कोकडवार, राज्य प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र येरावार यांच्यासह सर्व जिल्हाध्यक्ष, राज्य कार्यकारिणी सदस्य, जिल्हा पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!