
नविन नांदेड। गजानन महाराज व प्रगटदिना निमित्ताने सिडको हडको येथील गजानन महाराज मंदिरयेथेयज्ञ, महापुजा ,महाप्रसाद व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करून प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गजानन महाराज यांच्या प्रगटन दिनानिमित्त हडको येथील गजानन महाराज मंदिर देवस्थान येथे १३ फेब्रुवारी रोजी सकाळी विधीवत पूजा करून महायज्ञाला गुरू दिपक गुरू देशपांडे,सुनिल गुरु कुलकर्णी,कृष्णा गुरू देशपांडे, गोविंद गुरू शिगेदार यांच्या अधिपत्याखाली मंत्रजप ,होम हवन, अभिषेक, महाआरती करण्यात आली, दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन गजानन कते यांच्या वतीने करण्यात आले.

यावेळी भाजयुमो शहर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे व वृक्षमित्र मोहनराव पाटील घोगरे यांच्या ऊपसिथीत वृक्षारोपण करण्यात आले.विश्वस्त समितीचे अध्यक्ष डॉ.अनिल सातारकर,निलावार बाई, सौ.हिंडणे, सौ.समिता घोगरे,पांचाळ, सुमनबाई शहाणे,संगिता शंकुरवार, सौ.शांता बिडवई,सुमन पोलशेटवार,प्रेमला सुधाकर निराधार, महानंदा गुतापले,शालीनी नंरगले,सुनिता सुरेश राव घोगरे,चंद्रकला कळसे,सौ.निरमला पतेवार , संतोष मुसळे, सुरेश घोगरे,व भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सिडको येथील श्री गजानन महाराज मंदिर , संभाजी चौक येथे गजानन महाराज प्रकट दिवस निमित्ताने १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ८ श्रीचा अभिषेक , व सकाळी ८ ते १० होमहवन, १० ते श्री पालखी ,महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता, यावेळी काळा हनुमान भजनी मंडळ , सिडको हडको भजनी यांच्यी उपस्थिती होती यावेळी मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष मंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वीतेसाठी समस्त गजानन महाराज भक्त गण मंडळ व विश्वस्त यांनी परिश्रम घेतले.

