
नांदेड| दक्षिण रेल्वे ने सूचित केल्या नुसार ओखा-रामेश्वरम-ओखा साप्ताहिक एक्स्प्रेस तीन फेऱ्या साठी सालेम ते रामेश्वरम दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे, ती पुढील प्रमाणे —

दिनांक 14, 21 आणि 28 फेब्रुवारी, 2023 ला ओखा येथून सुटणारी गाडी संख्या 16734 ओखा –रामेश्वरम एक्स्प्रेस सालेम ते रामेश्वरम दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. म्हणजेच हि गाडी ओखा ते सालेम अशी धावेल.

दिनांक 17 आणि 24 फेब्रुवारी तसेच 03 मार्च, 2023 ला रामेश्वरम येथून सुटणारी गाडी संख्या 16733 रामेश्वरम – ओखा एक्स्प्रेस रामेश्वरम ते सालेम दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. म्हणजेच हि गाडी सालेम ते ओखा अशी धावेल.

