उमरखेड/हिमायतनगर, चांदराव वानखेडे। हिंगोली लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित असलेल्या राष्ट्रीय महामार्गाची कामे प्रामुख्याने पूर्ण व्हावेत आणि मराठवाडा- विदर्भ जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील पुलांना व रस्त्यांना निधी उपलब्ध करून द्यावा यासह हिंगोली लोकसभा मतदार संघातील विविध रस्ते विषयक कामाबाबत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री मा. ना. श्री नितीनजी गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन मागणी केली .
यावेळी मा. मंत्री महोदयांनी यास सकारत्मक प्रतिसाद देत तातडीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. मा. मंत्री गडकरी साहेबांची प्रत्येक भेट ही प्रचंड गती देणारी व महत्वपुर्ण मार्गदर्शन करणारी असते. गडकरी साहेबांचे रस्ते वाहतूक यामध्ये मोठे योगदान आहे. यावेळी हिंगोली लोकसभा मतदार संघातील विविध विषयांवर चर्चा झाली.
पैनगंगा नदीवर होणाऱ्या बंधाऱ्यांवरून विदर्भ व मराठवाडा जोडणारे पूल आणि रस्त्यांसाठी केंद्रीय (CRF) रस्ते विकास अंतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा.किनवट- हिमायतनगर या महामार्गाचे मागील अनेक दिवसापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण करावे. वारंगा – महागाव या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास गती द्यावी. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या तुळजापूर -नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास गती द्यावी. केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत हिंगोली लोकसभा मतदारसंघातील रस्त्याच्या कामांना निधी उपलब्ध करून दिला जावा. वारंगा फाटा येथे राहदारीसाठी सर्व्हिस रोड देण्यात यावा. अश्या मागण्या केल्या आहेत.