
नायगांव, रामप्रसाद चन्नावार। नायगांव तालुक्यातील मौजे मुस्तापूर येथे प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी हनुमान मंदिर येथे दिनांक 16/02/2023 ते 23/02/2023 पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पाहटे 4 ते 6 काकडा,6 ते 7 महारूद्र अभिषेक, 8 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, 10 ते 11 गाथा भजन, 12 ते 2 पगंतप्रसाद, 2 ते 4 प्रवचन, 4 ते 6 हरिपाठ, 6 ते 8 महाप्रसाद, 8 ते 11 हरीकिर्तन व हरिजागर, सप्ताहातील किर्तनकार दिनांक 16/02/2023 ह भ प परमेश्वर महाराज शाहापूरकर,दिनांक 17/02/2023 ह भ प संतोष महाराज कुशावाडीकर, दिनांक 18/02/2023 ह भ प भास्कर महाराज तळेगावकर, दिनांक 19/02/2023 ह भ प आनंद महाराज आतरगाव दिनांक 20/02/2023 ह भ प मीनाताई हिपनाळीकर,

दिनांक 21/02/2023,ह भ प परमेश्वर महाराज औराळकर, 22/02/2023 ह भ प शिवव्याखाते संतोष पुरी महाराज चोळाखेकर, दिनांक, 23/02/2023 सकाळी 8 ते 11 काल्याचे किर्तन ह.भ.प भागवत धर्म पचारक तथा ग्रामीण हरिनाम सप्ताहाचे शिल्पकार डॉ दिगांबर महाराज शिंन्दे गडगेकर, दि 22/02/2023 रोजी ज्ञानेश्वरीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून या कार्यक्रमानिमित्त परिसरातील साधू संत महंत किर्तनकार प्रवचनकार टाळकरी माळकरी भाविक भक्त उपस्थित राहणार आहेत तरी परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावे असे समस्त गावकरी मंडळ मौजे मुस्तापूर यांनी केले आहे.

