
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगांव तालुक्यातील मौजे मुस्तापूर येथिल परमेश्वर मंदीरास तीर्थक्षेत्रांचा दर्जा देऊन परमेश्वर मंदीर परिसराचा सर्वागीण विकास करावा असे प्रतिपादन ह.भ.प संतोष गिरी महाराज चोळाखेकर यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

मुस्तापूर येथिल परमेश्वर मंदीर हे पुरातन काळातील असून परमेश्वराच्या दर्शनासाठी आंध्रा, तेलंगणा ,महाराष्ट्रातील भक्त मोठ्या संख्येत येतात पण या पर्वत मंदिरावर जाण्यासाठी रस्ता नाही,पाणी विज ही सुविधा नाही.

वर्षभरात जवळपास लाखांहून अधिक भाविक परमेश्वराचं पवित्र दर्शन घेतात, विद्यमान आमदार राजेश पवार यांनी नायगांव विधानसभा मतदारसंघात अनेक धार्मिक तीर्थक्षेत्राना मोठ्या प्रमाणात निधी दिली. परंतू मुस्तापूर येथिल परमेश्वर मंदीराचा त्यांना विसर पडला कि काय अशी चर्चा भाविकांकडून होत आहे. तरी या परमेश्वर मंदीरास तीर्थक्षेत्र घोषित करून निधी उपलब्ध करून द्यावे व मंदीर परिसराचा विकास करावा असेही भाविकांकडून बोललेले जात आहे.

