
नवीन नांदेड। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नांदेड शहर जिल्हा उपाध्यक्षपदी गंगाधर कवाळे पाटील यांची निवड करण्यात आली सदरील निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या हस्ते नवनिर्वाचीत पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने पदाधिकार्यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. नवीन युवा पदाधिकार्यांना पक्षात काम करण्याची संधी दिली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर कार्यालयात दि. 14 फेब्रुवारी रोजी शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

या बैठकीला महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे पाटील, उपाध्यक्ष बंटी लांडगे, बाबुराव हंबर्डे, विलास गजभारे, गणेश तादलापूरकर, सय्यद मौला, शफी उर रहेमान, राहूल जाधव, युनूस खान, तरविंदरसिंघ बडगुजरा, एकनाथ वाघमारे, अरविंद महाराज मोरे, सयाद भाई, विकास वैद्य, विक्की कळकेकर, बच्चू यादव, दिलीप पाटील गवळी, गजानन लुटे, शहाजी पाटील, मारोेती चिवळीकर, हनुमंत पाटील, राहूल पाटील जाधव, संजय पाटील, बाबुराव येवले, रणजितसिंघ सिंदगीवाले, शिवराज पाटील धुरपडे, प्रविण कवाळे, व्यंकटेश शिंदे, कन्हैया भालके, शंकर शिंदे, ओम गायकवाड, सतिश शिंदे, माधवराव देशमुख, नारायण भालके, गोपीनाथ वरताळे आदींची उपस्थिती होती.

या बैठकीत आगामी निवडणुकीच्या संदर्भात पक्षसंघटन वाढीसाठी चर्चा करून कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातील पक्षहिताच्या बाबतीत शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्याकडे अडचणी सांगितल्या. यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम म्हणाले की, ग्रामीण व शहरी भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन वाढविणे गरजेचे आहे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी पक्ष सोबत आहे. कार्यकर्त्यांनी गावपातळीवर पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे ध्येय-धोरण सांगून पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

