
हिमायतनगर। दि. 13 फेब्रुवारी 2023 येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने वार्षिक शिबिराचे आयोजिन मौजे सरसम ता. हिमायतनगर येथे दिनांक 11 ते 17 फेब्रुवारी 2023 या कालावधीत संपन्न होत आहे. शिबिराच्या आज तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. दिलीप माने यांनी सकाळी ठीक सात वाजता विद्यार्थ्यांना चार ग्रुपमध्ये विभागून त्यांचे कडून योगासने, सर्वांग सुंदर व्यायाम आणि कवायत करून घेऊन छोटेखानी खेळाचे आयोजन केले व त्यांनी आपल्या व्यायामातून व मनोगतातून विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक तदृढ करण्याचा प्रयत्न केला. तद्नंतर याच सकाळच्या सत्रामध्ये शिबिरार्थीने अथक परिश्रम करून सरसम येथील ग्रामपंचायत परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तसेच सरसम येथील मुख्य रस्त्यावरील गाजर गवत निर्मूलन करून ग्रामपंचायतीचा परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर करून सेवक विद्यार्थ्यांनी गावासमोर आपला एक आदर्श निर्माण केला.

शिबिराच्या दुपारच्या उद्बोधन सत्रामध्ये कंधार येथील शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. माधव कदम यांनी ‘रस्ता सुरक्षा जनजागृती काळाची गरज’ या महत्वपूर्ण विषयांवर भाष्य करताना अनेक उदाहरणे व दाखले देऊन आपल्या खास शैलतून आपल्या विषयाची मांडणी केली. आणि सांगितले की मानसाने आपल्या संपूर्ण जीवन शैली वर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जर का वाहनाची गती वाढली की जीवनाची गती थांबण्याची शक्यता असते. म्हणून आपण वाहनाच्या गतीवर नियंत्रण ठेवणे अतिशय आवश्यक आहे.

तसेच वाहन चालवताना मध्यप्राशन करणे अथवा मोबाईलवर बोलणे म्हणजे स्वतः बरोबर कुटुंबाचे जिवन धोक्यात घालणे होय. म्हणून वाहनावर नियंत्रण ठेवणे काळाची गरज आहे. असे असे प्रतिपादन त्यांनी केले. या सत्रातील दूसरे मार्गदर्शक पुर्णेहून आलेले डॉ. पी. डी. सुर्यवंशी यांनी ‘राष्ट्रविकासात युवकांची भूमिका’ या विषयावर आपले सखोल मार्गदर्शन करताना अनेक उदाहरणे दाखले देऊन विद्यार्थ्यांना आपल्या खास शैलीमध्ये खिळवून ठेवून राष्ट्र उभारणीतील असलेले युवकांचे योगदान या विषयावर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. शेख शहेनाज ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. माधव कदम व तसेच डॉ. पी. डी. सूर्यवंशी हे लाभले होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शिवाजी भदरगे व तसेच सहकार्यक्रमाधिकारी डॉ. एल. बी. डोंगरे आदी मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली व तदनंतर प्रमुख पाहुण्याच्या स्वागतानंतर कार्यक्रमाची भूमिका व पाहुण्यांचा परिचय डॉ. एल. बी. डोंगरे यांनी करून दिला. व नंतर दोन्ही प्रमुख पाहुण्याच्या मनोगतनंतर कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप डॉ. शेख शहेनाज यांनी केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक निलेश चटणे यांनी केले तर आभार सृष्टी ठाकूर यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. दिलिप माने व श्री विश्राम देशपांडे, तसेच राहुल भरणे आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक व मोठ्या संख्येने विद्यार्थी ही उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

