
नांदेड। शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड व ग्रामीण टेक्नीकल अॅन्ड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपूरी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने 2022-23 या वर्षाचे 50 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजीत केले होते. यावेळी जिल्हाभरातील अनेक शाळेंनी सहभाग नोंदवला होता.

या वेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते सर्व प्रदर्शनातील कलाकृतींची पाहनी करून पुरस्कारासाठी निवड करन्यात आली. यात कुरुळा येथील श्री शिवाजी विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.प्रथम पुरस्कार जिंकणारे कु.साक्षी कालीदास दहिटणेकर , दिपाली बालाजी यमलवाड तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री स्वामी व्हि.एन. व श्री मुस्तापुरे पी.डी. यांनाही गौरविण्यात आले .

पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण तंत्रनिकेतन कॅम्पसचे प्राचार्य श्री पवार सर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते विदयार्थ्यांनी असेचं संशोधन वृत्तीस चालना देऊन समाजोपयोगी उपक्रम राबवून गाव , तालुका , जिल्हा , राज्य तसेच देशपातळीवर आपले नाव उज्ज्वल करावे असे प्रतिपादन अध्यक्षांनी केले .

