
अर्धापूर| तालुक्यातील मालेगाव येथील एका महिलेस लग्नाचे खोटे आमिष दाखवून तब्बल साडेचार वर्षे अत्याचार करणाऱ्या येथील युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,सदरील महिला गर्भवती आहे,काल कामठ्याच्या अल्पवयीन मुलीवर चॅकलेटचे आमिष दाखवून वीस वर्षीय तरुणांने अत्याचार केल्याचे उदाहरण ताजेच असतांना मालेगावच्या घटनेमुळे तालुका हादरला असुन,या फरार आरोपीला शोधण्यासाठी पोलिस कामाला लागले आहेत.

कामठा बु येथील सहा वर्षीय बालीकेवर चॅकलेटचे आमिष दाखवून एका युवकांने बलात्कार केल्याची घटना घडली असतांनाच अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील एका ३१ वर्षीय तरुणांने सप्टेंबर १८ ते जानेवारी २३ च्या दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून या महिलेवर अत्याचार केल्याची फिर्याद सदरील महिलेने अर्धापूर पोलिस ठाण्यात दिल्याने पोलिस खात्यात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी शशीकांत मुरलीधर अटकोरे वय (३५) रा.मालेगाव या तरुणाविरुध्द बलत्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याप्रकरणी कुणकुण लागताच सदरील आरोपी फरार झाला आहे,त्याचा शोध घेण्यासाठी अर्धापूर पोलिस त्याच्या मागावर आहे. पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साईनाथ सुरवसे, जमादार पप्पू चव्हाण हे अधिक तपास करीत आहेत.

