
अर्धापूर| तालुक्यातील देगाव येथे श्रीमदभागवद्गगीता , ज्ञानयज्ञ व लक्ष्मण शक्ती सोहळा वर्षे 13 वा साजरा होत आहे.

येथे सप्ताह दि. ८मे रोजीला प्रारंभ झाला असून, तर 15 फेब्रुवारी वार बुधवार रोजी समाप्त झाला, यावेळी भागवत कथा प्रवक्ते म्हणून ह. भ. प. नाथकन्या बालयोगिनी महंत मुक्ताईनाथ माऊली ( खेरडा ) ह्या लाभल्या, तर रोजचे कीर्तनकार म्हणुन ह. भ. प. प्रसिद्ध भागवतकथा कार मनोहर महाराज आळंदीकर, ह. भ. प. काशिनाथ महाराज माने फुलकळसकर, ह. भ. प. कृष्णा महाराज शास्त्री दस्तापूरकर, ह. भ. प. निवृत्ती महाराज इसादकर, ह. भ. प. राम महाराज सुगावकर आणि नामवंत कीर्तनकार म्हणुन ह. भ. प. अच्युत महाराज दस्तापुरकर, यांच्या काल्याचे कीर्तनाने व महाप्रसादाने सप्ताहाचा निरोप झाला.

