
नायगांव, रामप्रसाद चन्नावार। श्री क्षेत्र महादेव मंदीर गंगणबीड(तलबीड) ता. नायगांव जि.नांदेड येथे महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह ची सुरुवात १४ तारखे पासून झाली असून नामांकित कीर्तन कार यांची हजेरी या निमित्त लाभत आहे.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड हरीनाम सप्ताह ची सुरुवात झाली आहे.श्री भागवत अप्पा पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम चालू आहेत. सप्ताहातील दैनंदिनी कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकडा, सकाळी ८ ते ११ शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण, सकाळी ११ ते १२ गाथा भजन, सायं. ६ ते ८ हरिपाठ, रात्री ८ ते ९ शिवपाठ, रात्री ९ ते ११ किर्तन व श्री हरीचा जागर कार्यक्रम होत आहेत. दि. १४-२-२०२३ रोज मंगळवार कीर्तनकार, ह.भ.प. श्री श्रीधर महाराज कासराळीकर,दि. १५-२-२०२३ ,रोज बुधवार कीर्तनकार ह.भ.प. श्री मधुसूदन महाराज कापसीकर ,श्री बालाजी महाराज यांचे कीर्तन सेवा झाली आहे.

दि.१६-२-२०२३ रोज गुरुवार कीर्तनकार, ह.भ.प. श्री विश्वनाथ (बाबु) महाराज काकांडीकर,दि. १७-२-२०२३ रोज शुक्रवार कीर्तनकार ह.भ.प. भागवताचार्य चंद्रकांत महाराज लाठीकर दि. १८-२-२०२३ रोज शनिवार ह.भ.प. श्री गुरुराज महाराज देगलूरकर,दि. १९-२-२०२३ रोज रविवार कीर्तनकार ह.भ.प. कीर्तन केसरी श्री संतोष महाराज वनवे बीड दि. २०-१-२०२३ रोज सोमवार दुपारी ३ वा.महाप्रसाद रात्री कीर्तनकार ह.भ.प. आचार्य श्री पांडुरंग शास्त्री शितोळे यांचे कीर्तन होणार आहे दि. २१-२-२०२३ रोज मंगळवार सकाळी ९ ते ११ ह. भ. प. श्री विजय महाराज गवळी यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. परिसरातील भक्त गणांनी लाभ घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

