
हिमायतनगर| नुक्तचे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडलेल्या समाजाप्रती परोपकाराची भावना मनात ठेऊन आज बालाजी बलपेलवाड कुटुंबीयांनी लग्न वाढदिवसाचे औचित्य साधून सह परिवाराचे अवयव दान संकल्प केल्याचे पात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.

हिमायतनगर (वाढोणा) येथील ग्रामीण रुग्णालयात आज संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी हृदयाच्या शस्त्रक्रियामूळ पुनर्जन्म मिळालेले बंधूतुल्य बालाजी बलपेलवाड यांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी त्यांनी अवयव दानाचा संकल्प केल्याचे पत्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.

ग्रामीण रूग्णालयाचे अधिक्षक डॉ. डी डी गायकवाड यांच्या मारगदर्शनाखाली व जसलोक हॉस्पीटल मुंबईचे डॉ. हेमंत पठारे, डॉ. उपेंद्र भालेराव व इतर डॉक्टर आणि ब्रदर सिराजभाई यांच्या प्रेरनेणे आज दिनांक 15/02/2023 रोजी अवयव दानाचे संकल्प केला. यावेळी बालाजी राजाराम बलपेलवाड, अंजना बालाजी बलपेलवाड, अजिंक्य बालाजी बलपेलवाड, अनुजा बालाजी बलपेलवाड व अश्विनी बालाजी बलपेलवाड यांनी अवयव दानाचे संकल्प केले यावेळी उपस्थित रामभाऊ सूर्यवंशी भाजपा युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष, पत्रकार अनिल नाईक,डॉ.डी.डी गायकवाड डॉ .भुरके, डॉ. सदावर्ते , डॉ. बुरकुले, डॉ. कच्छवे, रमेश पाटील ,संतोष नारखेडे व इतर उपस्थित होते. त्यांच्या या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जाते आहे.

