
नांदेड। महाशिवरात्रीच्या पवित्र सणा निमित्याने तरोडा बु. मधील लक्ष्मीनारायण नगरात दि. 18 फेब्रुवारी शनिवार रोजी सायं. 7 वा. सुप्रसिद्ध गायक उकेश सिखवाल प्रस्तुत भजनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील भजनसंध्या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

मागील काही वर्षापासून महाशिवरात्रीच्या निमित्ताने लक्ष्मीनारायणनगरमध्ये दरवर्षी भजनसंध्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सुद्धा सुप्रसिद्ध गायक उकेश सिखवाल यांच्या गीत गुंजन संचाची भजनसंध्या आयोजित केली आहे. या भजनसंध्येचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार असुन या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजुरकर, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, नांदेड दक्षिणचे आ. मोहनअण्णा हंबर्डे, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ. मिनलताई खतगावकर, माजी महापौर जयश्रीताई पावडे, स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी,

जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व शिक्षण सभापती संजय बेळगे, काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर, जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, मजुर फेडरेशनचे चेअरमन लक्ष्मीकांत गोणे, माजी नगराध्यक्ष सुनिल शेटे, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष विजय देवडे, एस.सी. सेलचे शहराध्यक्ष मंगेश कदम, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव धर्माधिकारी, माजी उपमहापौर सतीष देशमुख तरोडेकर, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष मुळे, अवधुत क्षीरसागर, माजी नगरसेविका कविता मुळे, संगिता तुप्पेकर, ज्योती कदम, अविनाश रावळकर, अशोक कदम आदिंची या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थिती लाभणार आहे.

तरी या धार्मिक कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा कॉग्रेस कमिटीचे प्रवक्ते व संयोजक संतोष पांडागळे, ॲड. अरुण मोरे, संतोष सुर्यवंशी, श्रीनिवास बंकलवाड, अदित्य बकवाड यांनी केले आहे.

