
नांदेड| रमाई विचार मंचाच्या वतीने देण्यात येणाऱ्या माता रमाई गणगोत पुरस्कारांचे वितरण मोठ्या थाटामाटात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे विभागीय सचिव संबोधी सोनकांबळे, जिल्हाध्यक्ष पी. एम. वाघमारे, महिला उपाध्यक्षा रेखाताई पंडित, कार्यालयीन सचिव काशिनाथ गोडबोले, संघटक अर्जून चौदंते, लोहा तालुका कोषाध्यक्ष धोंडिबा यानभुरे, सिडको शहर पर्यटन उपाध्यक्ष विजय पंडित डी. ओ. केंद्रीय शिक्षक संतोष दुंडे, कंधारचेर एसएसडी सचिव विलास सोनकांबळे, सैनिक पर्यटन सचिव प्रकाश ढवळे नागलगांवकर, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष भगवान ढगे, संजय गायकवाड, साहेबराव शिखरे, साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, संयोजक माधवराव गोडबोले यांची उपस्थिती होती.

विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान स्री पुरुषांच्या मातांना जवळा देशमुख येथील रमाई विचार मंचाच्या वतीने रमाई जयंती, पौर्णिमोत्सव आणि समता सैनिक दलाच्या शिबिराची सांगता कार्यक्रमाचे औचित्य साधून रमाई गणगोत पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्कारांचे हे चौथे वर्ष असून सन २०२३ चे पुरस्कार रेखाताई पंडित, रेश्माबाई पंडित, गिरजाबाई जोगदंड, कावेरी श्रीमंगले, मुक्ताबाई लांडगे, कलावतीबाई कांबळे, रमाबाई शिराढोणकर, भारतबाई निखाते यांना प्रदान करण्यात आले.

पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल पुष्पहार, ग्रंथ असे असे होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शांताबाई माधवराव गोडबोले, पारुबाई योगाजी गोडबोले, निर्मला काशिनाथ गोडबोले, उषाबाई मारोती गोडबोले, निर्मला गणपत गोडबोले , वेणूताई गौतम गोडबोले, सुचित्रा किशन गोडबोले, संगिता विठ्ठल गोडबोले, श्रीदेवी संजय गोडबोले, सतीश गोडबोले, विलास गोडबोले, शिवकन्या जगदीश गोडबोले यांनी परिश्रम घेतले.

