
नांदेड| अर्धापूर तालुक्यातील कामठा येथील बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास कठोरातील कठोर शिक्षा द्यावी . हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालून आरोपीला फासावर लटकावावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी आज निवेदनाद्वारे केली आहे. आपल्या मागण्याचे निवेदन त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले.

अर्धापूर तालुक्यातील कामठा येथे दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सहा वर्षीय बालिकेला चॉकलेट देण्याच्या नावाखाली तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आरोपीवर पॉस्को कायद्याअंतर्गत कठोरातील कठोर कारवाई व्हावी ,या प्रकरणाचा तपास तज्ञ अधिकाऱ्यांमार्फत करावा, हा खटला जलदगती न्यायालयात चालून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रनिताताई देवरे चिखलीकर यांनी केली.

भाजपाच्या वतीने आज जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य शितलताई भालके महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस श्रद्धा ताई चव्हाण, अपर्णाताई चितळे, सुमित्रा वडस्कर सह महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

