
हिमायतनगर| आज दिनांक 15 फेब्रुवारी 2023 बुधवार रोजी महाविद्यालयात सकाळी ठीक साडेदहा वाजता सांस्कृतिक विभागातर्फे,संत सेवालाल महाराज यांची 284 वी जयंती साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे आयोजक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सविता बोंढारे व संस्कृतिक विभाग प्रमुख सहाय्यक प्रा.आशिष दिवडे सर हे होते. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्या, डॉ.उज्ज्वला सदावर्ते तर प्रमुख वक्ता म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या समाजशास्त्र व बालकल्याण समिती सदस्य नांदेडच्या डॉ. सत्यभामा जाधव प्रमुख पाहुणे लाभल्या डॉ. लक्ष्मण पवार (मराठी विभाग प्रमुख ) व श्री.संदीप हरसुलकर (कार्यालयीन अधीक्षक) यांची उपस्थिती होती. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले .

डॉ. सत्यभामा जाधव यांनी संतांचे सामाजिक कार्य विस्तृत स्वरूपात सांगितले,समज सुसंघटीत व जागृत करणाऱ्या संतांमधे संत सेवालाल महाराज यांचे योगदान सांगून जयंती निमित सर्वांना शुभेच्छा दिल्या . डॉ.लक्ष्मण पवार,यांनी संत सेवालाल महाराजांचे बंजारा समाजातील योगदान,समाजाचा इतिहास,त्याग, शंतीप्रियता,वेळप्रसंगी जहालता, इ. स. अठराशे काळी सांगितलेले सत्य भाकीत, महाराजांचा दूरदृष्टीकोन, सामजिक बांधिलकी,तंटामुक्ती या विषयी माहिती दिली.

श्री.संदीप हरसुलकर यांनी पोहरादेवी या गावचे महत्व,तेथील तीर्थस्थानाविषय ची माहिती,संत सेवालाल यांचा जीवन परिचय सांगून सद्या स्थितीत तिथे सरकारने अनेक सुविधा देऊन,संत सेवालाल महाराज यांचा गौरव ,कीर्ती लोकांपर्यंत पोहचवण्याचे कार्य सुरू आहे असे सांगितले. डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम,यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात संत सेवालाल यांचे कार्य सांगून ,नवीन पिढीने शिक्षित होऊन,त्यांच्या मार्गावर चालावे तरच समाजाचा व राष्ट्राचा विकास होईल असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सविता बोंढारे तर आभार प्रदर्शन प्रा. आशिष दिवडे सर यांनी केले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

